‘उजनी’ अखेर मायनसमध्ये | पुढारी

‘उजनी’ अखेर मायनसमध्ये

बेंबळे : पुढारी वृत्तसेवा :  अखेर मंगळवारी उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्‍त साठा संपून पाण्याने तळ गाठला. त्यामुळे धरणाची पातळी सकाळी 6 वाजल्यापासून आता मायनसमध्ये (63.41 टीएमसी, मृतसंचय) गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास उजनी धरण मायनसमध्ये जाण्यास 21 दिवस उशिरा झाला आहे. सध्या धरणातून विसर्ग सुरूच असून, आता मायनस पातळी आणखी खाली जाणार आहे.
सोलापूर, पुणे, नगरसह अनेक जिल्ह्यांसाठी उजनी वरदायिनी आहे. उजनी धरणामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. दरवर्षी उजनी धरण तुडुंब भरते; पण एकूणच वर्षभर पाणी उपशाने ते मायनसमध्ये जात असते. गेल्या वर्षी उजनी धरण 111 टक्के म्हणजे 123 टीएमसी भरले होते.

दरम्यान, गेले दोन वर्षात धरणात मे महिन्याच्या मध्यावर अचल पाणीसाठा मायनसमध्ये गेला होता. सध्याही धरण मायनसमध्ये गेले तरी पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न
उद्भवणार नाही. तरीही सध्या मुख्य कालव्यातून 1000 क्युसेक तर सीनामाढा 296. दहिगाव उपसा सिंचन 85 क्युसेक ने विसर्ग धरणातून चालू आहे.

उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो. एकूण 6 टीएमसी पाणी अतिरिक्त आहे. कारण उजनी धरण 100 टक्के भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते, त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले गेले. त्यामुळे आज उजनी प्लसमधून मायनस (चल साठ्यातून अचल) साठ्यात प्रवेश केला आहे.

गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. परिणामी रब्बी हंगामातील पाणी पातळी पुढे ढकलण्यात आल्याने उजनीत यंदा गत वर्षीचा तुलनेत 21 दिवसांनी पाणी पातळी मायनसकडे गेली. गतवर्षी 7 जून रोजी वजा 22. 42 टक्के इतका पाणीसाठा खलावला होता.
जिल्ह्यात जून महिन्याच्या 10 ते 15 जुलैपर्यंत मान्सून दाखल होत असतो. मात्र जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाही. परिणामी उन्हाळ्यात जगवलेली पिके जून, जुलै महिन्यात करपू लागतात. यंदा उजनीत मुबलक पाणीसाठा असल्याने ऊस व केळी सारख्या नगदी पिकांना पाणी मिळणार आहे. उजनी धरणातुन गेल्या आठ दिवसापासून दररोज एकअर्धा टक्का पाणी कमी होत आहे.
सध्यस्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीनामाढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे. धरणकाठचा उपसा सिंचन, बाष्पीभवन आदी कारणामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावणार हे नक्की. त्यामुळे त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेले दोन वर्षात धरणात मे महिन्याच्या मध्यावर अचल पाणीसाठा मायनसमध्ये गेला होता. सध्याही धरण मायनसमध्ये गेले तरी पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नाही. तरीही सध्या मुख्य कालव्यातून 1000 क्युसेक तर सीनामाढा 296. दहिगाव उपसा सिंचन 85 क्युसेक ने विसर्ग धरणातून चालू आहे. उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो. एकूण 6 टीएमसी पाणी अतिरिक्त आहे.

कारण उजनी धरण 100 टक्के भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते, त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले गेले. त्यामुळे आज उजनी प्लसमधून मायनस (चल साठ्यातून अचल) साठ्यात प्रवेश केला आहे.गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. परिणामी रब्बी हंगामातील पाणी पातळी पुढे ढकलण्यात आल्याने उजनीत यंदा गत वर्षीचा तुलनेत 21 दिवसांनी पाणी पातळी मायनसकडे गेली. गतवर्षी 7 जून रोजी वजा 22. 42 टक्के इतका पाणीसाठा खलावला होता.

जिल्ह्यात जून महिन्याच्या 10 ते 15 जुलैपर्यंत मान्सून दाखल होत असतो. मात्र जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाही. परिणामी उन्हाळ्यात जगवलेली पिके जून, जुलै महिन्यात करपू लागतात. यंदा उजनीत मुबलक पाणीसाठा असल्याने ऊस व केळी सारख्या नगदी पिकांना पाणी मिळणार आहे. उजनी धरणातुन गेल्या आठ दिवसापासून दररोज एकअर्धा टक्का पाणी कमी होत आहे.सध्यस्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीनामाढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे. धरणकाठचा उपसा सिंचन, बाष्पीभवन आदी कारणामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावणार हे नक्की. त्यामुळे त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजची उजनी पाणीपातळी
• एकूण पातळी – 490.995मीटर
• एकूण साठा – 1795.91 द.ल.घ.मी.
• उपयुक्‍त साठा – 6.90 द.ल.घ.मी.
• एकूण साठा – 63.41 टी.एम.सी.
• उपयुक्‍त साठा – 0.24 टी.एम.सी.
• टक्केवारी – _0.46 टक्के
विसर्ग
• नदी – बंद • कालवा – 1500 क्युसेक
• बोगदा -70 • बाष्पीभवन- 5.86 द.ल.घ.मी. प्रतिदिन • उजनीत सध्या साठा 63.41 टी.एम.सी.

Back to top button