मायनसच्या उंबरठ्यावर ‘उजनी’

उजनी
उजनी
Published on
Updated on

बेंबळे : सिद्धेश्वर शिंदे : सोलापूरसह पाच जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपत चालला आहे. सध्या धरणात मृतसंचय साठ्याच्या वर (मायनस) 0.12 टक्के इतका पाणीसाठा आहे. तोही कमी होऊन मंगळवारी (दि. 7) दुपारपासून उजनी धरण मायनसमध्ये जाणार आहे. अर्थात गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळपास 21 दिवस उशिरा मायनसमध्ये जाणार आहे.

गेले दोन वर्षांत धरणात मे महिन्याच्या मध्यावरही अचल पाणीसाठा मायनसमध्ये गेला होता. पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नसला तरी सध्या मुख्य कालव्यातून 1000 क्युसेक तर सीना-माढा 296, दहिगाव उपसा सिंचन 85 क्युसेकने विसर्ग धरणातून चालू आहे. त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. कारण उजनी धरण 100% भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111% पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले गेले.

उजनी प्लसमधून मायनस (चल साठ्यातून अचल) साठ्यात प्रवेश करणार आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. परिणामी रब्बी हंगामातील पाणी पातळी पुढे ढकलण्यात आल्याने उजनीत यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत 21 दिवसांनी पाणी पातळी मायनसकडे जात आहे. गेल्या 7 जूनला हा साठा वजा 22. 42 टक्के इतका पाणीसाठा खलावला होता.
सोलापूर जिल्ह्यात जून महिन्याच्या 10 ते 15 जुलै पर्यंत मान्सून दाखल होत असतो. मात्र जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाही. परिणामी उन्हाळ्यात जगवलेली पिके जून जुलै महिन्यात करपू लागतात. यंदा उजनीत मुबलक पाणीसाठा असल्याने ऊस व केळीसारख्या नगदी पिकांना पाणी मिळणार आहे.

उजनी धरणातून गेल्या आठ दिवसांपासून दररोज एकअर्धा टक्का पाणी कमी होत आहे. आज उजनी धरणाची पाणीसाठा 0.12% एवढ्या खाली आला आहे. तोही मंगळवारी दुपारपर्यंत संपलेला असेल. त्यामुळे उजनी धरण उपयुक्त (प्लस) साठ्यातून मृतसाठ्यात (मायनस) प्रवेश करणार आहे.

दुसरीकडे उन्हाळ्यात पिण्यासह शेतीसाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच नदीत पाणी सोडावे लागणार आहे. नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होईपर्यंत धरण मायनसमध्ये गेलेले असेल. त्यात सध्यस्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीनामाढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे.धरणकाठचा उपसा सिंचन, बाष्पीभवन आदी कारणामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावणार हे नक्की. त्यामुळे उजनी धरण आज दुपारपासून प्लस मधुन मायनसमध्ये जाईल. पुढे पावसाने भर पडून साठ्यात वाढ होईपर्यंत उपशामुळे किती साठा खाली जातो, याची चिंता प्रशासन आणि जनतेलाही लागून राहणार आहे.

हा मृतसाठा धरला जातो, तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. कारण उजनी धरण 100% भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111% पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले गेले.उजनी प्लसमधून मायनस (चल साठ्यातून अचल) साठ्यात प्रवेश करणार आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला होता.

परिणामी रब्बी हंगामातील पाणी पातळी पुढे ढकलण्यात आल्याने उजनीत यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत 21 दिवसांनी पाणी पातळी मायनसकडे जात आहे. गेल्या 7 जूनला हा साठा वजा 22. 42 टक्के इतका पाणीसाठा खलावला होता. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्याच्या 10 ते 15 जुलै पर्यंत मान्सून दाखल होत असतो. मात्र जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाही. परिणामी उन्हाळ्यात जगवलेली पिके जून जुलै महिन्यात करपू लागतात. यंदा उजनीत मुबलक पाणीसाठा असल्याने ऊस व केळीसारख्या नगदी पिकांना पाणी मिळणार आहे.

उजनी धरणातून गेल्या आठ दिवसांपासून दररोज एकअर्धा टक्का पाणी कमी होत आहे. आज उजनी धरणाची पाणीसाठा 0.12% एवढ्या खाली आला आहे. तोही मंगळवारी दुपारपर्यंत संपलेला असेल. त्यामुळे उजनी धरण उपयुक्त (प्लस) साठ्यातून मृतसाठ्यात (मायनस) प्रवेश करणार आहे. दुसरीकडे उन्हाळ्यात पिण्यासह शेतीसाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच नदीत पाणी सोडावे लागणार आहे. नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होईपर्यंत धरण मायनसमध्ये गेलेले असेल. त्यात सध्यस्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीनामाढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे.धरणकाठचा उपसा सिंचन, बाष्पीभवन आदी कारणामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावणार हे नक्की. त्यामुळे उजनी धरण आज दुपारपासून प्लस मधुन मायनसमध्ये जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news