सोलापूर :अ‍ॅट्रॉसिटीसह खंडणीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल | पुढारी

सोलापूर :अ‍ॅट्रॉसिटीसह खंडणीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जमिन विकल्याच्या कारणावरून बांधकाम व्यावसायिकाला एक कोटी रुपयाची खंडणी मागणार्‍या मायलेकांसह तिघांंविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर तरुणास जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाविरुध्दही सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अंकुर अनिल पंधे (वय 41, रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन गेनसिध्द चाबूकस्वार, त्यांची आई व विलास तळभंडारे या तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गेनसिध्द सोमण्णा ऊर्फ सोमलिंग चाबुकस्वार (वय 32, रा. राघवेंद्र नगर, मजरेवाडी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून अंकुर अनिल पंधे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाबुकस्वार हे आई व मावस भावासह23 मे रोजी सायंकाळी पंधे यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी ऑफीसमधील इंजिनिअर सुहास हलकुडे यास तुझा मालक कुठे आहे, तुझ्या मालकास आमची जागा आम्हास परत करायला लाव नाही तर आम्हाला एक कोटी रुपये द्यायला सांग, असे म्हणून वॉचमन प्रतापसिंह परदेशी यास दमदाटी करून शिवीगाळ केली. यावरून पंधे यांच्या फिर्यादीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले पुढील तपास करीत आहेत.

चाबुकस्वार यांच्या फिर्यादीनुसार 22 मे रोजी रात्री पंधे यांच्या ऑफिसमध्ये तुझी जमीन देत नाही, तुला काय करायचे ते करून घे असे म्हणून पंधे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबतची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी पुढील तपास करीत आहेत.

Back to top button