वैराग : पुढारी वृत्तसेवा : मातीतून सुरू झालेली कुस्ती आज मॅटवर पोहोचली आहे. माती पेक्षा मॅटवरील कुस्तीला ग्लोबल दर्जा मिळत आहे. शिवाय याचा फायदा नोकरीची संधीही मिळते. त्यामुळे करिअर म्हणून कुस्ती क्षेत्र निवडू शकता, असे मत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी केले.
ते वैराग येथे त्यांचे मित्र उत्कर्ष डुरे यांच्या भेटीला आले असता, आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी उत्कर्ष डुरे यांच्या परिवाराच्या वतीने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे भाऊ पै. राजवर्धन पाटील यांचा सत्कार आनंदकुमार डुरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जय जगदंबा शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, वस्ताद किशोर ताटे, संतनाथ कुस्ती मैदानाचे पै. नंदकुमार पांढरमिसे वैजिनाथ आदमाने, लक्ष्मण देवकर, पै. किशोर सावंत आदी उपस्थित होते.
सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये कुस्तीतील नाते अतूट आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत ही सोलापूर आणि कोल्हापूर यांच्यातच रंगली अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. ज्युनियर वर्ल्ड स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करून सैन्यदलामध्ये हवालदार पदावर कार्यरत झालेल्या पृथ्वीराज पाटील यांनी कुस्ती दिवसेंदिवस बदलत आहे. मातीचा गंध न सोडता मॅटवरची कुस्तीला प्राधान्य द्यावे, जेणेकरून नोकरीच्या माध्यमातून करिअरदेखील साधता येईल, असे सांगितले. जर मॅटवरील कुस्तीमध्ये यशस्वी ठरत आले तर सदृढ आरोग्यासोबत सक्षम जीवनशैलीदेखील जगता येऊ शकते, एक संधी असल्याचे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. कपिल कोरके, निरंजन भूमकर, नंदकुमार पाढरमिसे, वैजिनाथ आदमाने, सुरेश गुंड, बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक शहाजी आगलावे, सुरेश गुंड, खंडेराया घोडके, सुभाष सुरवसे नगरसेवक अक्षय ताटे, वस्ताद पिंटू लांडगे, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे किरण डिसले, जय हनुमान तालमीचे वस्ताद बप्पा सुतार व सर्व सदस्य, इर्लेचे माजी उपसरपंच संजय डुरे-पाटील, बनू सावंत, घाणेगांव येथील वस्ताद बालाजी शिंदे, मेजर जगन्नाथ आदमाने, सूर्यकांत मगर, प्रमोद गायकवाड, रयत सेवक बँकेचे संचालक विजयकुमार डुरे, धीरज डुरे, अथर्व देशमुख, ओम मगर, सुनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पै. पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुधीर गायकवाड यांनी केले तर आभार आनंदकुमार डुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पै.किशोर सावंत व पै.उत्कर्ष डुरे यांच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे शनिवारी सोलापुरातील वैराग येथे आले होते. दरम्यान त्यांनी तुळजापूर येथे जाऊन कुलस्वामीनी आई तुळजाभवानी व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा दोन्ही ठिकाणी मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.