पोलिसपाटलांना लढविता येणार सहकारी निवडणुका, राज्य शासनाचा आदेश

पोलिसपाटलांना लढविता येणार सहकारी निवडणुका, राज्य शासनाचा आदेश

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पोलिसपाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार आहेत. तसे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने काढले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील 27 हजार पोलिसपाटलांना संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील पोलिसपाटलांच्या मागण्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी 22 फेब्रुवारी 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पोलिसपाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत पोलिसपाटलांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. पान 2 वर

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पोलिस पाटील यांना लढता येणार नाहीत. पोलीस पाटलांना किमान पंधरा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी, निवृत्तीची वयोमर्यादा साठ वर्षाहून 65 वर्षे करणे,नूतनीकरण कायमचे बंद करणे,पोलीस पाटलांना अनुकंपा कायदा लागू करणे, कोरोनामध्ये मयत झालेल्या पोलीस पाटील यांच्या वारसांना 50 लाख रुपये विमा संरक्षण तात्काळ मिळावे या व अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीने गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. यात पोलिस पाटलांना सहकारी संस्थेमध्ये निवडणूक लढविण्यास मुभा द्यावी अशी मागणी संघटनेने वेळोवेळी प्राधान्यनाने केली होती.त्या मागणीला यश आले आहे.

पोलीस पाटलांच्या उर्वरित मागण्या सुद्धा लवकरच मान्य करणार असल्याचे व त्यानुसार शासन निर्णय काढू असे आश्वासन पोलीस पाटील शिष्टमंडळास गृहमंत्री यांनी दिले आहे.राज्यात सध्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे ,त्यामुळे इथून पुढच्या काळात पोलीस पाटील यांना सहकार संस्थेमध्ये निवडणूक लढविण्यास पात्र झाले आहेत.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पोलिस पाटील यांना लढता येणार नाहीत.पोलीस पाटलांना किमान पंधरा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी, निवृत्तीची वयोमर्यादा साठ वर्षाहून 65 वर्षे करणे,नूतनीकरण कायमचे बंद करणे,पोलीस पाटलांना अनुकंपा कायदा लागू करणे, कोरोनामध्ये मयत झालेल्या पोलीस पाटील यांच्या वारसांना 50 लाख रुपये विमा संरक्षण तात्काळ मिळावे या व अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीने गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. यात पोलिस पाटलांना सहकारी संस्थेमध्ये निवडणूक लढविण्यास मुभा द्यावी अशी मागणी संघटनेने वेळोवेळी प्राधान्यनाने केली होती.त्या मागणीला यश आले आहे.

पोलीस पाटलांच्या उर्वरित मागण्या सुद्धा लवकरच मान्य करणार असल्याचे व त्यानुसार शासन निर्णय काढू असे आश्वासन पोलीस पाटील शिष्टमंडळास गृहमंत्री यांनी दिले आहे.राज्यात सध्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे ,त्यामुळे इथून पुढच्या काळात पोलीस पाटील यांना सहकार संस्थेमध्ये निवडणूक लढविण्यास पात्र झाले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत पोलिसपाटील संघटनेची बैठक झाली.त्यानुसार हा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे.
दिलीप पाटील, जिल्हाध्यक्ष पोलिस पाटील, संघटना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news