बेसिक ‘पोलिसिंग’ राबवू; नूतन आयुक्त सुधीर हिरेमठ

बेसिक ‘पोलिसिंग’ राबवू; नूतन आयुक्त सुधीर हिरेमठ

Published on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

नूतन पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी सोलापूर पोलिस आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त हिरेमठ म्हणाले, शहरात बेसिक पोलिसिंग राबविणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मावळते पोलिस आयुक्त हरिष बैजल हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर मंगळवारी रात्री नूतन पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारला. हिरेमठ यांच्याकडे पुणे, सीआयडीचे उपमहानिरीक्षक पदाचा पदभार आहे. त्यांना सोलापूर पोलिस आयुक्तपदाचाही पदभार देण्यात आला आहे.

यावेळी हिरेमठ म्हणाले, सोलापुरातील अवैध धंद्याबाबतची माहिती घेऊन त्यांना आळा घालणार आहे. चोर्‍या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग रोखण्यासह शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहे.दरम्यान, नूतन पोलिस आयुक्त हिरेमठ हे सोलापुरात नक्की किती काळ राहाणार याविषयी सध्या पोलिसी वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. त्यांच्याकडे सोलापूरचा अधिकचा चार्ज आहे. हिरेमठ यांच्याकडे सध्या सीआयडीचे उपमहानिरीक्षक या पदाचा भार आहे. त्या विभागातील कामाच्या व्यापात श्री. हिरेमठ सोलापूरकडे कितपत लक्ष देऊ शकतील. कितपत वेळ देऊ शकतील, याविषयीही चर्चा आहे. सोलापूरसाठी स्वतंत्र पोलिस आुयक्त लवकरात लवकर नियुक्त करावा, अशी मागणी पोलिसी वर्तुळातून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news