विद्यार्थ्यांनी बनवले उद्योेजकांसाठी वेबपेज | पुढारी

विद्यार्थ्यांनी बनवले उद्योेजकांसाठी वेबपेज

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापुरातील सोरेगाव येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उद्योजकांना हवे तसे वेबपेज बनविले आहे.
ए.जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. आरती वळसंग व प्रा. स्मिता कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षातील इरेश क्यार, ओंकार कटारे, महादेव गोडबोले, गौरव गुराम, स्वप्निल कनकी व प्रज्ञा नायकवाडी या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे.

निर्माण करण्यात आलेल्या पेजमध्ये उद्योजकांना गुंतवणूकदार मिळवून देणे हा एकमात्र उद्देश आहे. बाजारात असे अनेक वेबपेज किंवा अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदार मिळू शकतो. परंतु जर एखाद्या उद्योजकाला शेती या व्यवसायाकरिता गुंतवणूकदार हवा असेल तर त्याला तसे वेगळे विभाजित वेबपेज किंवा अ‍ॅप शोधावे लागते. ही गरज ओळखून या वेबपेजमध्ये विविध विभागांतील उद्योजक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून त्यांचे काम सुलभ करुन देण्यात आले आहे. सरकारमान्य इन्क्युबेशन सेंटरकडून उद्योजकांना उद्योग स्थापित करण्याकरिता व गुंतवणूकदार उपलब्ध करुन देण्याचे काम होते. परंतु या इन्क्युबेशन सेंटरचे काम किंवा त्याचा उपयोग अद्याप नवीन उद्योजकांना ज्ञात नाही.

त्यामुळे अशा उद्योजकांची ही समस्या लक्षात घेऊन वेबपेजवर उस्मायन केंद्र हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय नवीन उद्योजकांना शोधण्यासाठी एक प्रभावी मार्ग ठरत आहे. संस्थेचे अध्यक्ष ए.जी. पाटील, सचिव एस.ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम.ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस.ए. पाटील व उपप्राचार्य डॉ. व्ही.व्ही. पोतदार व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख यांनी गुणवंत पेज बनविणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Back to top button