सोलापूर : फेक कर्जाचा जिल्ह्यातील 37 युवकांना फास | पुढारी

सोलापूर : फेक कर्जाचा जिल्ह्यातील 37 युवकांना फास

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सोलापूरच्या सात रस्ता परिसरात गरुड बंगला येथे एका इमारतीमध्ये असलेल्या खासगी फायनान्स कंपनीच्या फेक कर्जाचा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 37 युवकांच्या गळ्याला फास बसला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कंपनीच्या पुण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांना फैलावर घेताच फसवणूक झालेल्यांना एनओसी देऊ, अशी भूमिका संबंधितांनी घेतली.

या कंपनीकडून फसवणूक झालेल्या 37 व्या युवकाने सिबिल खराब झाल्याचे समजताच तातडीने बुधवारी कंपनीचे कार्यालय गाठले. तेव्हा त्याला कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याविषयी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांना माहिती समजताच त्यांनी थेट कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची खरडपट्टी काढली. जोपर्यंत फसवणूक झालेल्या सर्व युवकांना कंपनीकडून एनओसी मिळत नाही, तोपर्यंत कंपनीचे कार्यालय चालू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

दरम्यान, फसवणूक झालेल्या युवकासह कंपनीच्या स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन अमोल शिंदे आणि माऊली पवार यांनी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
त्यावर जिल्हाधिकारी शंभरकरसुद्धा संतापले आणि ज्याचा दोष नाही आणि ज्याचा या कर्जाची काहीही संबंध नाही अशा सर्व युवकांना कंपनीकडून तातडीने एनओसी देण्याचे आदेश दिले. तसे न झाल्यास फसवणूक झालेले युवक आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील असा दम भरला.

दिवसभरातील या सर्व घडामोडींमुळे कंपनीचे सोलापूरचे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले. त्यांनी पुणेस्थित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून कंपनीकडून न्याय देण्याचा शब्द मिळवला. तरीसुद्धा जोपर्यंत फेक कर्जात अडकलेल्या युवकांना एनओसी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही, असा इशारा शिंदे आणि पवार यांनी दिला.

सात रस्ता परिसरातील जगजीवन कॉम्प्लेक्स गरुड बंगला या कार्यालय आहे. या कार्यालयातील एक कर्मचारी, एक एजंट आणि एका बँकेच्या कर्मचार्‍याने संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 37 युवक आणि नागरिकांच्या नावावर वाहनासह अन्य कर्जे काढून ती उचलली. विशेष म्हणजे याचे बिंग फुटू नये म्हणून आरोपींनी स्वतः काही महिने हफ्तेसुद्धा भरले.
नंतर फसवणुकीची एकेक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांनी वर्षभरापूर्वी जुना विडी घरकुल येथील किरण कोंडा आणि जुनी मिल कंपाऊंड येथील मोहम्मद ख्वाजा पाशा मोहम्मद कासिम मुल्ला या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कंपनीचे सोलापूर कार्यालयामधील एरिया सेल्स मॅनेजर तुकाराम यनगंटी यांनी हा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील शिवाजी बाबर या युवकाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 10 लाखाचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु आपले सिबिल रेकॉर्ड खराब असल्यामुळे आपणास मंजूर झालेले कर्ज देता येत नाही असे बँकेकडून सांगण्यात आल्यानंतर बाबर यांना धक्का बसला. त्यांच्या नावावर एल अँड टी कंपनीकडून बनावट कागदपत्रे जोडून 2020 सालात दीड लाख रुपयाचे फेक कर्ज प्रकरण केल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने सोलापुरातील सात रस्ता परिसरातील कंपनीचे कार्यालय गाठले. बुधवारी दुपारी बराच वेळ थांबून त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची याबाबत विचारणा केली असता त्यांना यातून सुटायचे असेल तर कर्जाचा आकडा जितका आहे, तितकी रक्कम भरण्यास सांगून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या बाबर यांनी शिंदे आणि पवार यांच्या कानावर हा विषय घातला.

कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

दरम्यान, फसवणूक झालेल्या युवकासह कंपनीच्या स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन अमोल शिंदे आणि माऊली पवार यांनी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यावर जिल्हाधिकारी शंभरकरसुद्धा संतापले आणि ज्याचा दोष नाही आणि ज्याचा या कर्जाची काहीही संबंध नाही अशा सर्व युवकांना कंपनीकडून तातडीने एनओसी देण्याचे आदेश दिले. तसे न झाल्यास फसवणूक झालेले युवक आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील असा दम भरला.

दिवसभरातील या सर्व घडामोडींमुळे कंपनीचे सोलापूरचे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले. त्यांनी पुणेस्थित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून कंपनीकडून न्याय देण्याचा शब्द मिळवला. तरीसुद्धा जोपर्यंत फेक कर्जात अडकलेल्या युवकांना एनओसी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही, असा इशारा शिंदे आणि पवार यांनी दिला.

सात रस्ता परिसरातील जगजीवन कॉम्प्लेक्स गरुड बंगला या कार्यालय आहे. या कार्यालयातील एक कर्मचारी, एक एजंट आणि एका बँकेच्या कर्मचार्‍याने संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 37 युवक आणि नागरिकांच्या नावावर वाहनासह अन्य कर्जे काढून ती उचलली. विशेष म्हणजे याचे बिंग फुटू नये म्हणून आरोपींनी स्वतः काही महिने हफ्तेसुद्धा भरले.
नंतर फसवणुकीची एकेक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांनी वर्षभरापूर्वी जुना विडी घरकुल येथील किरण कोंडा आणि जुनी मिल कंपाऊंड येथील मोहम्मद ख्वाजा पाशा मोहम्मद कासिम मुल्ला या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

कंपनीचे सोलापूर कार्यालयामधील एरिया सेल्स मॅनेजर तुकाराम यनगंटी यांनी हा गुन्हा दाखल केला.दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील शिवाजी बाबर या युवकाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 10 लाखाचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु आपले सिबिल रेकॉर्ड खराब असल्यामुळे आपणास मंजूर झालेले कर्ज देता येत नाही असे बँकेकडून सांगण्यात आल्यानंतर बाबर यांना धक्का बसला.

त्यांच्या नावावर एल अँड टी कंपनीकडून बनावट कागदपत्रे जोडून 2020 सालात दीड लाख रुपयाचे फेक कर्ज प्रकरण केल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने सोलापुरातील सात रस्ता परिसरातील कंपनीचे कार्यालय गाठले. न त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची याबाबत विचारणा केली असता त्यांना यातून सुटायचे असेल तर कर्जाचा आकडा जितका आहे, तितकी रक्कम भरण्यास सांगून त्रास दिला.

45 लाखांची फसवणूक

फायनान्स कंपनीच्या मॅनेजरसह अन्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कंपनीची फसवणूक करून जवळपास 37 जणांच्या नावावर फेक कर्ज प्रकरणे केली. यातून सुमारे 45 लाखांहून अधिक रक्कम उचलली. त्या सर्व अधिकारी कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे फसवणूक झालेल्याना एनओसी देऊ शकत नाही, असे कंपनीच्या पुण्यातील अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button