सोलापूर : तहान भागवण्यासाठी मुक्या जनावरांची माण नदीवर गर्दी | पुढारी

सोलापूर : तहान भागवण्यासाठी मुक्या जनावरांची माण नदीवर गर्दी

सांगोला (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा : कडक उन्हाळा त्यातच तहानलेली जनावरे माण नदीवर पाण्यासाठी गर्दी करू लागली आहेत.
गेल्या दहा वर्षांत माणनदीला मे महिन्यात कधीही पाणी नव्हते. गतवर्षी झालेला चांगला पाऊस व माणनदीवरील बंधार्‍यामध्ये पाणी अडवले होते.
यामुळे ऐन उन्हाळ्यात माननदी मधील खोलगट ( डोहामध्ये) भागात काही ठिकाणी पाणी साचलेले दिसते. हे आजवर कधीही पाहायला मिळाले नव्हते.

यामुळे तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. ऐन उन्हाळ्यात माण नदीमधील डोहामध्येपाणी साचलेले दिसत आहे. हे पाणी पिण्यासाठी गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांना उपयुक्त ठरत आहे. हे पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यात नदी काठाला जनावरे गर्दी करताना दिसत आहेत. तसेच या पाण्यामध्ये म्हैस व इतर जनावरे कडक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी पोहण्याचा ही आनंद लुटत आहेत.

 

Back to top button