सोलापूर : सार्वजनिक जयंतीसाठी 31 गावांना मूर्तींचे वाटप | पुढारी

सोलापूर : सार्वजनिक जयंतीसाठी 31 गावांना मूर्तींचे वाटप

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जुळे सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेच्यावतीने बसव जयंतीनिमित्त सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा, कर्नाटकातील 31 गावांना सार्वजनिक बसव जयंती उत्सव साजरा करण्यासाठी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते बसव मूर्तींचे वाटप करण्यात आले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून बसव जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून गेल्या दहा वर्षांपासून सार्वजनिक बसव जयंती उत्सव साजरा करण्यासाठी मूर्ती वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आजपर्यंत 300 हून अधिक बसव मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी माजी आ. शिवशरणअण्णा पाटील-बिराजदार, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, बसवराज शास्त्री हिरेमठ, वे. बसवराज शास्त्री, सुदर्शन सुतार, राजू हौशेट्टी, महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष गिरीश किवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, अविनाश पाटील, सुदर्शन बिराजदार उपस्थित होते. आ. विजयकुमार देशमुख यांनी सध्या महात्मा बसवेश्वशरांच्या विचारांची गरज आहे. स्वर्ग, नरक हे जीवन संपल्यानंतर नाही तर चांगल्या लोकांचे विचार ऐकल्यानंतर व चांगले कर्म केल्यानंतर जिवंतपणीच स्वर्गाची अनुभूती होते. वाईट कृत्यांतून नरकाचे मार्ग मोकळे होतात. यामुळे नरकात जायचे की स्वर्गात हे आपल्या कार्यावरच आपण ठरवावे. मृत्यूनंतर काही खरे नसते, असे विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, आप्पा चिवरे, निंगय्या स्वामी, बसवराज पनशेट्टी, मयूर स्वामी, अमित रोडगे, धनंजय वरनाळ, परमेश्वर माळगे, सचिन कोठाणे, बालाजी लाड, वैभव लोंढे, ऋषिकेश धुमाळ, स्वप्निल कोठाणे, यांच्यासह पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शशिकांत वसंतपुरे यांनी केले. आभार उत्सव समितीचे अध्यक्ष खंडू सलगरकर यांनी मानले.

सामाजिक उपक्रमांत पुढाकार

श्रीशैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत 100 हून अधिक जोडप्यांचे लग्न लावून देणे, अपंगांना स्वखर्चाने घर बांधून देणे, तीन हजारांहून अधिक बाटल्यांचे रक्तसंकलन, 300 हून अधिक बसव मूर्तींचे वाटप, जळीतग्रस्त निराधारांना घर बांधून देणे, कोरोना काळात पोलिस गोरगरिबांना शिधावाटप, अन्नदान असे अनेक उपक्रम राबविले आहेत. हे उपक्रम स्तुत्य आहेत, असे आ. देशमुख यांनी सांगितले.

Back to top button