सोलापूर : कर्जमुक्‍ती योजनेचे 168 कोटी जमा

39 हजार 487 अर्ज : 37 हजार 614 शेतकर्‍यांना लाभ
168 crores of loan waiver scheme
कर्जमुक्‍ती योजनेचे 168 कोटी जमाPudhari Photo
Published on
Updated on

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतून जिल्ह्यातील 37 हजार 614 शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये 168 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. नियमित पिककर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतर बँकांकडून जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना विनाव्याज 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे.दरम्यान सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षात नियमित पिककर्ज परतफेड केलेल्या 699 खातेदारांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण केले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात आले नाही.

168 crores of loan waiver scheme
शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेतून शेतकर्‍यांना मिळणार 550 कोटी
  • प्रोत्साहनपर अनुदानासाठी प्राप्‍त अर्ज - 39 हजार 487

  • आधार प्रमाणीकरण झालेली खाते    - 38 हजार 993

  • आधार प्रमाणीकरण शिल्‍लक          - 699

  • रक्‍कम वितरीत झालेली खाती        - 37 हजार 614

  • लाभ वितरित झालेली रक्‍कम         - 168 कोटी

168 crores of loan waiver scheme
पुण्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा शानदार शुभारंभ
शेतकरी कर्जमुक्‍ती योजनांर्गत 37 हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले आहे. 699 शेतकरी पात्र असूनही आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाले नाही. त्या शेतकर्‍यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करावे.
-किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news