पेट्रोल, प्रदुषणमुक्तीसाठी देशात इलेक्ट्रिक हायवे बांधणार : नितीन गडकरी

पेट्रोल, प्रदुषणमुक्तीसाठी देशात इलेक्ट्रिक हायवे बांधणार : नितीन गडकरी
Published on: 
Updated on: 

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. या सर्वांतून सुटका होण्यासाठी आता देशात इलेक्ट्रिक हायवे बांधण्यात येणार आहे. आता बस आणि ट्रकही इलेक्ट्रिक केबलवर चालतील, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सोलापूर येथे सोमवारी (दि. 25) शासकीय मैदानावर श्री. गडकरी यांच्या हस्ते सोलापूर-विजयपूर, सोलापूर अक्कलकोट, वाटंबरे ते मंगळवेढा तेथून सोलापूरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग अशा एकूण 250 कि.मी. 894 मीटर लांबीच्या 8017 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर आढेगाव जंक्शन येथे 2 किमीच्या भुयारी मार्गासह विविध कामांचे उद्घाटन त्यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सोलापूर-विजयपूर महामार्गावरील शहर ते राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी 29 कोटी 12 लाख पुणे सोलापूर हैद्राबाद येथे जमखंडी पूल बांधण्यासाठी 2 कोटी 68 लाख रुपये, मोहोळ-कुरुल-कामती, कणबस आचेगाव वळसंग धोत्री मुस्ती तांदुळवाडी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 54 कोटी 7 लाख तर सोलापूर विजयपुर महामार्गावारी शहरातील रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी 29 कोटी 64 लाख रुपयांच्या कामांचे भूमीपूजनही त्यांच्याहस्ते पार पडले.

याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विजयपूरचे पालकमंत्री उमेश कट्टी, खा. डॉ जयसिध्देश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, विजापूरचे खा. रमेश जिगजिनगी, आ. रणजितसिंह मोहीते पाटील, आ. सुभाष देशमुख, आ विजयकुमार देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, रस्ते विकास विभागाचे अवधुत श्रीवास्तव, सुहास चिटणीस आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले अनेक रस्ते, पूल तसेच आमदार खासदारांनी सूचविलेले रेल्वे पुल, रिंगरोड तसेच नव्याने सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड कॉरिडॉर अशा जवळपास 42 कामांसाठी 60 हजार कोटी रुपयांची कामे जिल्ह्यात सुरू आहेत.त्यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. तर काही कामांचा डीपीआर तयार करण्यात आलेला आहे. जी कामे अद्याप सुरु नाहीत ती लवकरच सुरु करण्यात येतील.

ते म्हणाले, त्यापैकी सुरत चेन्नई हा सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून 153 किमीचा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 9 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे.त्यामुळे या कामाला येत्या सहा महिन्यात सुरुवात होईल.

गडकरी म्हणाले, सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलासाठी 1100 कोटीचा खर्च आहे.त्यासाठी भूसंपादन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिका आणि राज्यशासनाने तरतुद करावी. जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी यासाठी निधी तरतूद करावी. जर त्यांच्याकडून हे झाले नाही तर मला स्वत:च्या खात्याचे पैसे खर्चून हे अश्वासन पाळावे लागेल.

ते म्हणाले, भविष्यात शहर वाढत जाणार आहेत. त्यामुळे वाहतुकीवर ताण पडणार आहे.तसेच इंधनाचा खर्च ही वाढत जाणार आहे.परिणामी प्रदुषण आणि इंधनावरील खर्च टाळण्यासाठी आता अनेक मोठमोठ्या शहरांतून वाहतूक करण्यासाठी इलेक्ट्रीक हायवे ही संकल्पना पुढे आणणार आहे. यामध्ये इलेक्ट्रीक रोपव्दारे ट्रक आणि बस चालतील. त्यासाठी राज्य परिवहन महामार्गाकडून स्वतंत्र लाईन टाकण्यात येतील. मोठमोठ्या शहरात 165 ठिकाणी हा प्रयोग करण्यात येणार आहे. यामुळे इंधनाची ही बचत होणार आहे. तसेच शहरांतर्गत दळणवळण करण्यासाठी नागरिकांना कमी खर्चात एअर कंडीशन बसमध्ये प्रवास करणे सोयीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news