सोलापूर : राष्ट्रीयीकृत बँक कर्मचार्‍यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प | पुढारी

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बँक कर्मचार्‍यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प

सोलापूर / पिलीव : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय कामगार संघटनेने पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंद मध्ये राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी, पोस्ट खाते, वीज वितरण कंपनी त्याच पद्धतीने राष्ट्रीय कामगार असलेल्या संस्था व संघटनांचे कामगार संपात सहभागी झाल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेत.

आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून ऑनलाईन व्यवहार पूर्ण करण्याकडे सर्वसामान्य व्यक्तीचा कल दिसत आहे. पोस्टल कर्मचार्‍यांच्या संपामुळे पोस्टाचा कारभार, आर्थिक व्यवहार, टपाल सेवा आदी ठप्प झाले आहे.

फक्त कंत्राटी कामगार कामावर आलेले दिसतात. मात्र, पोस्टमास्तर व कायमस्वरूपी पोस्टमन कर्तव्यावर नसल्याने टपाल व्यवस्था, मनी ऑर्डर, रजिस्टर आदी सेवा ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्याच पद्धतीने वीज वितरण कंपनीच्या कायमस्वरुपी कामगारांनी या संपात सहभाग नोंदवला. यामुळे वीज वितरण कंपनीचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसत आहे. वीज पुरवठा करण्यामध्ये काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून वीज वितरण कंपनीचे कंत्राटी कामगार कामावर असल्याने वीज पुरवठ्यामधील तात्पुरत्या स्वरुपाचा घोटाळा कंत्राटी कामगार दूर करताना दिसत आहेत.

वीजबिल भरणा करण्यासाठी, शंकांचे निरसन करण्यासाठी अधिकारी कामावर नसल्याने वीजबिल भरणा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, सर्वात जास्त फटका पिलीव येथील बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे त्यांनी 28 ते 30 मार्चपर्यंत बँकेचे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार, काऊंटर व कामकाज बंद राहील, अशा आशयाची सूचना बँकेने शाखेत लावली आहे. संपामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.

 

Back to top button