उभं आयुष्य शरद पवारांच आग लावण्यात गेलं : सदाभाऊ खोत | पुढारी

उभं आयुष्य शरद पवारांच आग लावण्यात गेलं : सदाभाऊ खोत

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले. त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे. एका घरात आग लावायची, तिथलं झालं की दुसर्‍या घरात आग लावायला जायचं, हे काम शरद पवार करत आहेत. त्यांच्या या धोरणामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला आहे, आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.

सांगलीतील अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या स्मारकाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. याबाबत बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर टीका केली. खोत सोलापूर दौर्‍यावर आले असून ते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

खोत पुढे म्हणाले की, शरद पवार हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलं नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचेच काम केले. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवारऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे.

यावेळी खोत यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावरुनही निशाणा साधला. आईला काही उपहार दिले असेल, तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात, पण आई वसुलदार असेल, तर मात्र लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या मातोश्रीवर उपकार केलेले, मात्रं लिहून ठेवले जातात. आई ही वसुली अधिकारी नसते, मात्रं, जिथं वसुली होते, तिथं मात्र लिहून ठेवले जाते, असा टोला खोत यांनी लगावला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button