सोलापूर :  बंदुकीच्या धाकाने चेन स्नॅचिंग करणारे दोघे अटकेत | पुढारी

सोलापूर :  बंदुकीच्या धाकाने चेन स्नॅचिंग करणारे दोघे अटकेत

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : बंदुकीचा धाक दाखवून चेन स्नॅचिंग करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्टल, 4 जिवंत काडतुसे व सोन्याचे दागिने, असा 7 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे 9 व फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे 2, असे 11 गुन्हे उघडकीस आणले.

अनिल शंकर नलवडे (वय 28, रा. पोतेकर वस्ती, गोतोंडी, ता. इंदापूर, पुणे, सध्या कविटगाव, ता. करमाळा, सासर्‍याच्या घरी) व राजेंद्र दिनकर बागडे (वय 26, रा. पोतेकर वस्ती, गोतोंडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
मागील दीड वर्षांपासून विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून चोरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी दोन नातींना घेऊन घराकडे जाणार्‍या आजीला रस्त्यात अडवून मोटारसायकलवरून  ( ख पान वरून) आलेल्या दोघांनी त्यांना पिस्टलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लंपास केले होते. अशा घटना वारंवार होत असल्याने पोलिस आयुक्त हरिश बैजल, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन फौजदार संदीप शिंदे व त्यांच्या पथकने चेन स्नॅचिंगविरोधात मोहीम तीव्र केली.

चोरीचे सोने विकण्यासाठी टाकीला असलेल्या मोटारसायकलवरुन दोघेजण पुना नाका येथून सोलापुरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुना पुना नाका येथील पुलावर सापळा लावला. स्पीडब्रेकरजवळ मोटारसायकलचा वेग कमी झाल्यावर पोलिसांनी दोघांना पकडले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी पिस्टल, 4 जिवंत काडतुसे व सोन्याचे दागिने आढळून आले. एकूण 7 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघाननी 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली.

ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, फौजदार संदीप शिंदे, पोलिस नाईक शंकर मुळे, संदीप जावळे, संतोष येळे, पोलिस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, अभिजित धायगुडे, उमेश सावंत, राजू मुदगल, चालक सतीश काटे यांनी पार पाडली.

आलेल्या दोघांनी त्यांना पिस्टलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लंपास केले होते. अशा घटना वारंवार होत असल्याने पोलिस आयुक्त हरिश बैजल, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन फौजदार संदीप शिंदे व त्यांच्या पथकने चेन स्नॅचिंगविरोधात मोहीम तीव्र केली.

चोरीचे सोने विकण्यासाठी टाकीला असलेल्या मोटारसायकलवरुन दोघेजण पुना नाका येथून सोलापुरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुना पुना नाका येथील पुलावर सापळा लावला. स्पीडब्रेकरजवळ मोटारसायकलचा वेग कमी झाल्यावर पोलिसांनी दोघांना पकडले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी पिस्टल, 4 जिवंत काडतुसे व सोन्याचे दागिने आढळून आले. एकूण 7 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघाननी 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली.

ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, फौजदार संदीप शिंदे, पोलिस नाईक शंकर मुळे, संदीप जावळे, संतोष येळे, पोलिस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, अभिजित धायगुडे, उमेश सावंत, राजू मुदगल, चालक सतीश काटे यांनी पार पाडली.

एक टोळी सापडली, दुसर्‍या टोळीचा शोध सुरू
चेन स्नॅचिंग करणारी दोन आरोपींच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलिस चेन स्नॅचिंग करणार्‍या दुसर्‍या टोळीच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी दिली.

Back to top button