साेलापूर : तुळजापुरात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा | पुढारी

साेलापूर : तुळजापुरात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा

तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुतळ्यासाठी राज्य शासनाने सर्व प्रकारची मान्यता दिली आहे. एक कोटी रुपये खर्च करून पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी नगरपरिषदेच्या वतीने घेतला होता. त्यास शासनाने मंजुरी दिल्याबद्दल तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी शासनाचे आभार मानले आहेत. पुतळ्यामुळे तुळजापूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

तुळजापूर विकास प्राधिकरणांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण करण्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता वरील संदर्भाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तथा चौक सुशोभीकरण संदर्भाने 30 मार्च 2021 रोजी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तुळजापूर विकास प्राधिकरण बैठक 28 जुलै 2021 रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश मूळ किमतीपेक्षा 30 टक्क्यांनी वाढ होत असल्याने त्यास शासनाची मान्यता घेण्याबाबत निर्णय घेण्यात येऊन 9 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधान सचिव नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार मान्यतेबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून या प्रस्तावास 28 डिसेंबर 2021 मान्यता घेतली आहे.

त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणाच्या कामास आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सुधारित मान्यतेचे आदेश प्राप्त होतात. पुतळ्या संदर्भाने 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणादिवशी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मार्गदर्शक विनोद गंगणे यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी आणण्याबाबत समाज बांधवांसमक्ष मागणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भाने नगरसेवक औदुंबर कदम, किशोर साठे, तानाजी कदम आदींनी पाठपुरावा केलेला आहे. चौक सुशोभीकरण करणे, 87.31 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा बसवणे 12 लाख असे एकूण 1 कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

35 वर्षांपासून चाललेल्या लढ्याला यश मागील 35 वर्षांपासून तुळजापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी तुळजापूर शहरात वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अनेकांंनी सतत पाठपुरावा केल्याने हे काम पूर्ण झाले. पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

Back to top button