

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा
सात रस्त्यावरून जुना एम्प्लॉयमेंट चौकाकडे जाणाऱ्या व्हीआयपी रोडवर असलेल्या मलबार गोल्ड शोरूम समोर अचानक हायवा ट्रक घुसून दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जेवण करण्यासाठी बसलेले सुरक्षा गार्ड थोडक्यात बचावले.
ही घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाचा ताबा सुटला की ब्रेक फेल झाला हे समजले नाही. ट्रक थेट सुरक्षा भिंतीला जाऊन धडकून थांबला. यावेळी सुरक्षा भिंत पडून नुकसान झाले. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरून बेदरकारपणे होणारी रात्रीची अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिंकातून करण्यात येत आहे.