सातारा : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं! .. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव   

सातारा : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं! .. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव   
Published on
Updated on

म्हसवड; पुढारी वृत्तसेवा :  'सिद्धनाथाच्या नावानं चांगभल'च्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव उत्साहात पार पडला. यात्रेमुळे अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली. अवघं शहर भक्तिरसात तल्लीन झालं. अखिल महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यांतील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत असणार्‍या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती वाजत-गाजत रथामध्ये बसविण्यात आल्या. अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच बाळासाहेब माने,माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला.

रथ नगरप्रदक्षिणेस बायपास रस्त्याने सुरुवात झाली. भाविकांनी 'सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं'च्या गजरात रथावर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. अनेक भक्तांनी निशाने, नारळ, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली. नवीन नगरपालिका, महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चोकातून सातारा – पंढरपूर रस्त्यावर रथाने मार्गक्रमण केले. श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्‍यांच्या हस्ते साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय, श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.

भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडल्या होत्या. म्हसवड पोलिस स्ठेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलिस उपअधीक्षक यांच्यासह सात पोलिस अधिकारी,140 पोलिस कर्मचारी, 35 महिला अधिकारी, 50पोलिस पाटील, होमगार्ड तसेच सपोनि राजकुमार भुजबळ, आपत्कालीन पथक यांचा समावेश होता.

आ. जयकुमार गोरे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी नगराध्यक्ष विलास माने, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय धट, सौ. साधना गुंडगे, आप्पा पुकळे, सर्जेराव माने, युवराज सूर्यवंशी, बबनदादा वीरकर, दत्तोपंत भागवत, इंजि.सुनिल पोरे, प्रा.विश्वंभर बाबर , परेश व्होरा, सरपंच काका माने, आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. यात्रेतील विक्रेत्यांची दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. गावोगावच्या मानाच्या काट्या, सासणे मुक्कामासाठी बाजार पटांगणात सुविधा करण्यात आली होती. दरम्यान, प्रांताधिकारी, डीवायएसपी, तहसिलदार श्रीशैल वटी, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि राजकुमार भुजबळ, इंजिनियर चैतन्य देशमाने, नितीन तिवाटणे, सागर सरतापे व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पुरवठा अधिकारी शिंगाडे, परदेशी, राहुल जाधव, गाव कामगार तलाठी अकडमल, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news