सातारा : श्रीराम कारखान्याला विरोधकच राहिला नाही : आमदार रामराजे नाईक निंबाळकर

सातारा : श्रीराम कारखान्याला विरोधकच राहिला नाही : आमदार रामराजे नाईक निंबाळकर

Published on

फलटण; पुढारी वृत्तसेवा : नीरा खोर्‍यातील अतिशय सुबत्ता असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात केलेल्या अडचणी आपल्याला भोगाव्या लागल्या. परंतु आता शेतकर्‍यांना पेमेंट, कामगारांना पगार कोट्यवधी रुपयांचा तोटा असलेला कारखाना नफ्यात असल्याने आता कारखान्याला विरोधकच राहिलेले नाहीत. पाणी आणण्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले पण आम्हाला कारखाना काढायचा समजलेच नाही. आता पाणी आमचं आणि कारखाना यांचा परंतु हा कारखाना थोड्याच दिवसांत विकावा लागेल, असा टोला विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नाव न घेता लगावला. श्रीराम सहकारी साखर करखान्याच्या 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ते बोलत होते.

यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, डी.के. पवार, विश्वासदादा गावडे, धनंजय पवार, मोहनराव नाईक निंबाळकर, प्रा. भीमदेव बुरुंगले, अशोकराव पवार, चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर उपस्थित होते. श्रीराम कारखाना अवसायानात न काढण्याच्या आ. रामराजे यांच्या भुमिकेमुळे ही सर्वसाधारण सभा होत असल्याचे स्पष्ट करुन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी या दोन सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या भागीदारी संस्थेने पुढील 15 वर्षे सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज चर्चा फक्त नफा किती झाला याचीच होत आहे. यापुर्वी कारखाना कसा चालणार ? आणि तोटा किती याची चर्चा व्हायची. तालुक्यातील ऊसाचे वाढते क्षेत्र व वेळेवर गाळप होण्यात ऊस उत्पादकांची होणारी कुचंबना टाळण्यासाठी श्रीरामची गाळप क्षमता वाढवणे आवश्यक असून यंदा 4 हजार 200 एव्हरेजने साडेसहा लाख टन उसाच्या गाळपाचे लक्ष असून अर्कशाळेची कार्यक्षमता वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी नोटीस वाचन केले. स्वागत संचालक संतोष खटके यांनी केले. आभार संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news