

कराड; पुढारी वृत्तसेवा : रयत अथनी शुगर लिमिटेड शेवाळवाडी म्हासोली ता. कराड येथील साखर कारखान्याने उचांकी एक रकमी एफआरपी 2925 रूपये देऊन ऊस दराची कोंडी फोडली आहे. एकरकमी एफआरपी देणारा हा जिल्ह्यातील पहिला कारखाना असल्याने रयत शेतकरी संघटनेनेने कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील व कार्यकारी संचालक रविंद्र देशमुख यांना धन्यवाद दिले आहेत.
रविंद्र देशमुख यांनी शेतकर्यांचे हित जपत महत्वाचा निर्णय घेतला आहे. एक रकमी एफआरपी 2925 रूपये कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. प्रतिटन एक किलो साखर सोळा रुपयाच्या दराने देऊन शेतकर्यांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे.
कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक रविंद्र देशमुख यांनी शेतकर्यांच्या उसाला चांगला दर दिला तसेच एक किलो साखर दिली. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व रयत क्रांती संघटनेच्या वतीने कारखाना व्यवस्थापनास धन्यवाद दिले आहेत. रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक लोहार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांना एकरकमी पैसे मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.