सातारा : बुस्टर डोसकडे सातारकरांची पाठ

सातारा : बुस्टर डोसकडे सातारकरांची पाठ
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या जास्त असली तरी विविध नागरिकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 941 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र आहेत. मात्र 59 हजार 716 नागरिकांनीच या डोसचा लाभ घेतला आहे. अवघ्या 14.74 टक्के नागरिकांनी बुस्टर डोसला प्राधान्य दिले असून 85.26 टक्के नागरिकांनी या डोसकडे पाठ फिरवली आहे.

सातारा जिल्ह्याला गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीने ग्रासले होते. या कालावधीत प्रशासनाने कोविड लसीकरणावर जोर दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात प्रभावीपणे लसीकरण मोहिम राबवली होती. त्यासाठी आरोग्य विभागामार्फत जनजागृती केल्याने लसीकरणासाठी विविध आरोग्य केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे दोन्ही डोस घेतले. तर अधूनमधून लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहिम संथ गतीने सुरु होती. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहिम चांगल्या पध्दतीने राबवल्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात आली. जावली तालुक्यात 10 हजार 187 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र असून त्यापैकी 2 हजार 169 जणांनी डोस घेतला आहे.

कराड तालुक्यात 81 हजार 621 नागरिक पात्र असून त्यापैकी 10 हजार 668 जणांनी डोस घेतला आहे.खंडाळा तालुक्यात 26 हजार 912 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र असून त्यापैकी 2 हजार 967 जणांनी डोस घेतला आहे. खटाव तालुक्यात 29 हजार 945 नागरिक पात्र असून त्यापैकी 5 हजार 27 जणांनी डोस घेतला आहे. कोरेगाव तालुक्यात 31 हजार 797 नागरिक पात्र असून त्यापैकी 5 हजार 25 जणांनी डोस घेतला आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात 11 हजार 29 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र असून त्यापैकी 3 हजार 155 जणांनी डोस घेतला आहे. माण तालुक्यात 37 हजार 255 नागरिक पात्र असून त्यापैकी 3 हजार 519 जणांनी डोस घेतला आहे.

पाटण तालुक्यात 39 हजार 71 नागरिक पात्र असून त्यापैकी 5 हजार 132 जणांनी डोस घेतला आहे. फलटण तालुक्यात 52 हजार 68 नागरिक पात्र असून त्यापैकी 5 हजार 616 जणांनी डोस घेतला आहे. सातारा तालुक्यात 62 हजार 783 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र असून त्यापैकी 12 हजार 974 जणांनी डोस घेतला आहे. वाई तालुक्यात 22 हजार 273 नागरिक पात्र असून त्यापैकी 3 हजार 464 जणांनी डोस घेतला आहे. जिल्ह्यात 4 लाख 4 हजार 941 नागरिक पात्र असून त्यापैकी 59 हजार 716 जणांनी डोस घेतला आहे. अद्यापही सुमारे 85 टक्के नागरिकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे.

आरोग्य विभागाकडून जनजागृतीची गरज

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने लसीकरणाच्या दोन्ही डोससाठी गावोगावी जनजागृती केल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. तसेच आरोग्य विभागाने बुस्टर डोससाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. जनजागृती केल्यास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांसह बुस्टर डोससाठी पात्र असलेले नागरिक लसीकरणाकडे वळतील. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांमार्फत बुस्टर डोससंदर्भात गावोगावी सूचना देणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news