सातारा : बंदूक परवाना जिल्ह्याचा.. वापर राज्याचा

सातारा : बंदूक परवाना जिल्ह्याचा.. वापर राज्याचा
Published on
Updated on

सातारा; विठ्ठल हेंद्रे : सातारा जिल्ह्यात बेकायदा शस्त्रधारकांचा सुळसुळाट असतानाच परवानाधारकांचीही मनमानी सुरु असल्याचे वास्तव समोर येत आहे. परवानाधारक शस्त्रधारकांनाही जिल्हा, राज्य व देश या तीन ठिकाणी त्या-त्या परवानगीनुसार शस्त्र वापरण्याची परवानगी असताना ते कुठेही वापरले जात आहे. यामुळे सर्वच शस्त्रधारकांची झाडाझडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे परवानाधारकांवर अपवादात्मकच कारवाई झाली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासन काम करत असते. जिल्हाधिकारी कार्यालय परवानाधारक बंदूक परवाना देण्याचे काम करते. नाहरकतीमध्ये अनेकदा पोलिसांकडून फुलीच मारली जाते. मात्र, वशिला लावून बंदूक परवान्यासाठी खटाटोप केला जातो. आतापर्यंत 6087 जणांनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला असता त्यापैकी जिल्ह्यात 4019 जणांना परवाना देण्यात आला आहे.
दरवर्षी बंदूक परवानाधारकांना त्याचे नुतनीकरण करावे लागते. बंदूक वापरताना ती सार्वजनिक ठिकाणी कशी वापरावी? याबाबतही निर्देश आहेत. मात्र अनेक परवाना बहाद्दर ती बंदूक दिसेल अशा पध्दतीने त्याचे प्रदर्शन करत आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

जवानांना देशभरासाठी परवाना : बंदूक परवाना घेत असताना कागदपत्रांची चाळण करुनच परवाना दिला जातो. विविध प्रकारची कागदपत्रे व नाहरकत प्रमाणपत्र लागतात. उत्साहापोटी त्याची पुर्तता केली जाते. सुरुवातीला परवाना मिळताना जिल्ह्यासाठी मिळतो. त्यानंतर राज्यभरासाठी परवाना मागणीनुसार मिळतो. अगदी देशभरात कुठेही परवानाधारक बंदूक वापरण्याचा अधिकार आहे. मात्र देशभराऐवजी प्रामुख्याने जिल्हा व राज्यात वापरणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, जवान तसेच आर्मीतील अधिकार्‍यांना बंदूक घेताना ती देशभरासाठी वापरण्याचाच परवाना दिला जातो. याउपर जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर जिल्हा व राज्यासाठीच परवाना अधिक प्रमाणात दिला जातो.

शेंद्रे फायरिंगची बंदूक परवानाधारक…

शेंद्रे, ता. सातारा येथे 15 दिवसांपूर्वी परवानाधारक बंदुकीला कव्हर घेतले जात असताना बंदुकीतून अचानक फायर झाल्याने त्यातून सुटलेली गोळी थेट कर्मचार्‍याला लागली. क्षणभर मॉल अक्षरश: हादरुन गेला. वास्तविक कव्हर घेतले जात असताना रिव्हॉल्व्हर लोड नसती तर ही दुर्घटना टळली असती. मात्र लोडेड बंदूक सार्वजनिक ठिकाणी काढून कव्हरची हौस भागवताना ती दुसर्‍याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली.

इलेक्शनवेळी बंदूक पोलिसांच्या कस्टडीत

निवडणूक कालावधीत परवानाधारक व्यक्तींना बंदूक स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याची सक्ती असते. या कालावधीत हजारोंनी बंदूका जमा करण्यासाठी धावपळ असते. परवानाधारक बंदूक पोलिसांच्या कस्टडीत जमा करायची व इलेक्शन संपले की ती बंदूक परत आणायची यासाठी यंत्रणा अक्षरश: कामाला लागते. अनेकदा परवानाधारक व्यक्ती बंदूक जमा करत नसल्याचे समोर आले आहे. वेळ नसणे, परगावी असणे अशी, कारणे देऊन वेळ मारुन नेली जात आहे. दरम्यान, अनेकदा परवानाधारक व्यक्ती सक्षम नसतानाही (अपंग झाली आहे, अधिक वय, अशी कारणे) त्याचे नावे बंदूक असल्याचेही वास्तव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news