सातारा : पेट्रोल पंपांवर ‘एक्स्ट्रा प्रिमियम’चा वाहनचालकांना भूर्दंड

सातारा : पेट्रोल पंपांवर ‘एक्स्ट्रा प्रिमियम’चा वाहनचालकांना भूर्दंड

उंडाळे; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली. पेट्रोल, डिझेल पंपाचालकांच्या अडेलतट्टू भूमिकेने कराड शहराजवळील काही पेट्रोल पंप चालकांकडून जादा दराचे पेट्रोल खपवण्यासाठी साधे पेट्रोल शिल्लक असतानाही एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची इच्छा नसतानाही त्यांना जादा दराचे पेट्रोल भरावे लागत आहे. पेट्रोल पंपावरील सेवा सुविधांचाही अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे.

कराड शहरासह तालुक्यातील काही पेट्रोल पंपावर एक्स्ट्रा प्रिमियमचे पेेट्रोल भरण्याची वेळ येते याचे काय कारण आहे. काही पेट्रोल पंपांवर सुविधाचा अभाव आहे. पंपावर स्वच्छतागृह आहेत पण ती अस्वच्छ आहेत किंवा कुलूप बंद तरी आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय अनेक पंपांवर नाही. पेट्रोल पंपावर साधे पेट्रोल शिल्लक असताना पंपावर एक्स्ट्रा प्रीमियम तेल भरण्यास सांगितले जाते. साधे पेट्रोल संपले आहे एवढेच सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव ग्राहकाला ज्यादा दराच्या एक्स्ट्रा प्रीमियम तेलाची खरेदी करावी लागते.

पेट्रोल पंपावरील एका लेनवर तेल गाडी खाली करण्याच्या नावाखाली ही पेट्रोल विक्री केली जाते. दुसर्‍या बाजूला एक्स्ट्रा प्रीमियमचा खप वाढवण्यासाठी साधे पेट्रोल शिल्लक असतानाही हे पंप चालक साधे पेट्रोल संपले आहे एवढेच म्हणून एक्स्ट्रा प्रीमियम तेल भरण्याचा आग्रह धरतात. साध्या आणि एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलमध्ये सहा ते सात रुपयांचा फरक पडतो. साध्या पेट्रोलचा दर 106 रुपये 72 पैसे तर एक्स्ट्रा प्रीमियमचा दर 112 रुपये 77 पैसे आहे.
त्यामुळे ग्राहकाला गरज नसतानाही एक्स्ट्रा प्रीमियम तेल घ्यावे लागते. एक्स्ट्रा प्रिमियम तेल ग्राहकांना घेण्यासाठी भाग पाडले जाते. प्रशासनाने अशा पेट्रोल पंप चालकावर कारवाई करून ग्राहकाला जे तेल हवे आहे तेच द्यावे अन्यथा साधे पेट्रोल संपले असेल तर त्याबाबत प्रशासनाने अचानक तपासणी करून खात्री करावी.

कराड तालुक्यात पेट्रोल पंपांची संख्या अधिक आहे. या पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृह अस्वच्छ आहेत. काही ठिकाणी ती कुलूप बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांची कुचंबना होते. अनेक पंपावर शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. पाणी पिण्यासाठी ग्लास ठेवला जात नाही. प्लास्टीकचा ग्लास ठेवला जातो. काही ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवलेले भांडे अत्यंत अस्वच्छ असते. त्यामुळे प्रशासनाने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी सर्व पेट्रोल पंपांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

कराड तहसीलदारांकडून दुर्लक्ष ..

कराड शहर व तालुक्यात मुख्य रस्त्यावर अनेक पेट्रोल पंप आहेत.यातील काही पेट्रोल पंपांवर सुविधांची वाणवा आहे. स्वच्छतागृह कुलूप बंद आहेत. हवा भरण्याची सोय नाही. तेथे कर्मचार्‍याची नेमणूक नाही. पेट्रोल पंपावर अचानक पेट्रोल संपले आहे, एक्स्ट्रा प्रमियम पेट्रोल भरा असे सांगितले जाते. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असताना कराड तहसीलदार यांनी हजर झाल्यापासून किती पेट्रोल पंपांची तपासणी केली हा संशोधनाचा विषय आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news