सातारा : नियम पाळा, कारवाईची हौस नाही; प्रशासनाकडून मंडळांना आवाहन

सातारा : नियम पाळा, कारवाईची हौस नाही; प्रशासनाकडून मंडळांना आवाहन
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवावेळीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन दरवर्षी बहुतांश गणेश मंडळांकडून केले जाते. त्याच पद्धतीने यावर्षीही गणेश मंडळांनी नियम पाळत सहकार्य करावे. कारवाईची आम्हाला हौस नाही आणि कारवाईमुळे आमचेच काम वाढते. मात्र न्यायालयाचे आदेश पाळणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे असे आवाहन पोलिस अधिक्षक अजकुमार बन्सल यांनी केले. त्याचवेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी गणेश मंडळांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसिलदार यांच्यासह विविध शासकीय खात्यांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

प्रारंभी बैठकीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेचे दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशिद यांनी कोल्हापूर नाका, मार्केट यार्ड परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याकडे लक्ष वेधले. मागील काही दिवसांपासूनची ही समस्या आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना याबाबत सूचना करत गणेशोत्सवापूर्वी सर्व तांत्रिक बिघाड दूर करण्याची मागणी केली.

माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी केवळ गणेशोत्सव व शिवजयंतीवेळी आवाजाची मर्यादा पाळावी, यासाठी प्रशासन आग्रही भूमिका घेते. वर्षभर विविध उत्सव व सण असतात, त्यावेळी अशा पद्धतीने पोलिसांनी भूमिका घ्यावी अशी मागणी करत असे होत नसल्याने विनाकारण गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व प्रशासनाबाबत गैरसमज निर्माण होतात, याकडे लक्ष वेधले. स्मिता हुलवान यांनी गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांकडून लावल्या जाणार्‍या बॅनरवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत एका मंडळाने एकच बॅनर लावावा, याबाबतची सूचना करण्याची विनंती केली. माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी पाच दिवसानंतर गणेशोत्सवातील देखाव्यांना प्रारंभ होतो. रात्री 9 नंतर लोक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. रात्री दहा वाजता देखावे बंद करावे लागतात. त्यामुळे ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी प्रशांत यादव यांनी केली. त्यानंतर रूचेश जयवंशी यांनी मंडळांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली. आपल्या अधिकार कक्षेत असल्यास देखाव्यांना वेळ वाढवता येते का? याबाबतही योग्य तो निर्णय घेऊ असे सांगत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. तर पोलिस अधिक्षकांकडून दरवर्षीप्रमाणे कराडकरांनी पोलिसांसह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करत सहकार्याची ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news