सातारा: ठोसेघरला चाललाय, सावधान

सातारा: ठोसेघरला चाललाय, सावधान
Published on
Updated on

परळी;पुढारी वृत्तसेवा: गेल्या चार दिवसांपासून परळी, ठोसेघर, कास. परिसरात पावसाची संततधार सुरु असून यामुळे ओढेनाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर ठोसेघर, केळवली, पाटेघर, अलवडी या घाट रस्त्यांवरुन पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने दगडी व दरडी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पर्यटकांना जरा जपूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे.

बोरणे घाटात मंगळवारी सुमारे 15 ते 20 मिनिटे एक एक करत दरडीचा भाग कोसळत होता. यावेळी दुतर्फा वाहने थांबली होती. केळवली घाटरस्त्यावरही मोठ मोठी दगडे पाण्याच्या प्रवाहत रस्त्यावर आली आहेत. घाट रस्त्यांवर गेल्या आठवड्यांपासून दरडी पडत असल्याने पर्यटकांनी काळजी घेत निसर्गाचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्थानिकांनी केले.

परळी येथील अक्षय दळवी हे चारचाकी वाहनातून ठोसेघर येथे गेले होते. पावसाची संततधारही सुरु होती. बोरणे घाटात अचानक आल्यावर त्यांच्या गाडीसमोर मोठ मोठे दगड पडू लागले. क्षणभर त्यांना काही सुचलेच नाही. वरुन दरडीचा भाग कोसळत होता. या वेळी प्रसंगावधान राखून विलंब न करता त्यांनी आपले वाहन मागे घेतले व मागून येणार्‍या वाहनांनाही थांबवले. यामुळे मोठा अनर्थ टळला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news