सातारा : कोरेगावसाठी 20 कोटींचा निधी मंजूर

कोरेगाव
कोरेगाव
Published on
Updated on

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव नगरपंचायतीसाठी सत्तेत आलेल्या नव्या सरकारने नागरी सुविधा सहाय्य योजनेतून तब्बल 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाल्याने शहरातील सर्व विकासकामे जलदगतीने मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांनी माहिती दिली.

महाविकास आघाडी सरकारमध्येही नगरविकास मंत्री असताना ना. एकनाथ शिंदे यांनी कोरेगावला भरभरून निधी दिला होता. ना. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात आ. महेश शिंदे यांनी सहभाग घेत त्यांना साथ दिली होती. त्याचे फळ आता कोरेगावला मिळत आहे.
ना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई-बेंगलोर औद्योगिक कॉरिडोअरमध्ये कोरेगावात एमआयडीसी उभारण्याला मंजूरी दिली. त्यामुळे कोरेगावात औद्योगिक वसाहत सुरू होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. यानंतर आता कोरेगाव शहरातील विकासकामांसाठी तब्बल 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे विकासकामांना आता गती येणार आहे. या निर्णयामुळे कोरेगावकरांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

या निधीमधून जवाहर भोसले ते भानुदास बर्गे फुलाई परिसरात काँक्रीट रस्त्यासाठी 1 कोटी 75 लाख, बर्गे घर ते जगताप घर रस्ते काँक्रीटीकरण व नाल्यांसाठी 1 कोटी 75 लाख, प्रभाग एकमधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी 1 कोटी 50 लाख, प्रभाग दोनमधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी 1 कोटी 50 लाख, प्रभाग 3 मधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी 1 कोटी 50 लाख, प्रभाग क्रमांक चारमधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी 1 कोटी 50 लाख, प्रभाग 6 मधील रस्त्यांसाठी व गटारांसाठी 1 कोटी 50 लाख, प्रभाग 7 मधील रस्त्यांसाठी व गटारांसाठी 1 कोटी, प्रभाग 12 मधील रस्त्यांसाठी 1 कोटी, प्रभाग 8 मधील रस्त्यासाठी 50 लाख, प्रभाग 12 मधील रस्ते व गटार बांधण्यासाठी 50 लाख, प्रभाग 13 मधील रस्ते व गटार बांधकामासाठी दीड कोटी, प्रभाग 14 मधील रस्ते व नाल्यांसाठी दीड कोटी आणि प्रभाग 15 मधील रस्ते आणि गटार बांधकामासाठी दीड कोटी, प्रभाग 16 मध्ये ट्रिमिक्स काँक्रीट रस्ते व बंदिस्त गटारांसाठी 1 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news