सातारा : काळा कोट, तीन बायका अन् चर्चाच चर्चा

सातारा : काळा कोट, तीन बायका अन् चर्चाच चर्चा
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा न्यायालयात गुरुवारी दुपारी महिलांची वादावादी होऊन हातघाईपर्यंत प्रकरण गेल्याने खळबळ उडाली. सुमारे 15 मिनिटे दोन्ही महिलांची धराधरी झाल्यानंतर हे प्रकरण सातारा शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यावरून काथ्याकूट सुरू होता. दरम्यान, या प्रकरणाशी निगडित 'काळा कोट… तीन बायका अन् चर्चाच चर्चा' असाच प्रसंग सातार्‍यात रंगला होता.

याबाबत माहिती अशी, जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोन महिलांची बाचाबाची झाली. एकाने अगोदरच दोन लग्‍ने केली होती. त्यात पुन्हा तिसरीशी त्याचे गुफ्तगू सुरू असल्याच्या कारणाने हा प्रसंग उद्भवला होता. हाणामारी व धराधरीपर्यंत प्रकरण
गेल्याने काही काळ धावपळ झाली. दरम्यान, दोन्ही महिलांची चर्चा ऐकून उपस्थित अवाक् झाले. कोर्ट परिसरात झालेल्या या घटनेनंतर संबंधित महिला शहर पोलिस ठाण्याकडे गेल्या. दुपारी एका गटात दोन महिला व दुसर्‍या गटात काळ्या कोटसोबत एक महिला, असा सामना रंगला. शहरचे कारभारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अडकल्याने पोलिस ठाण्यासमोर बाहेर महिला पुन्हा व्यक्‍त होऊ लागल्या. यावेळी नेमके प्रकरण समोर आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यासमोर उपस्थित असणारे अवाक् झाले. काळ्या कोटमधील एकाने दोन लग्‍ने केली आहेत.

दोन्ही सवतींना नवर्‍याची तिसरी भानगड सुरू असल्याची कुणकुण लागली. मात्र, खात्री होत नव्हती. गेल्या चार दिवसांमध्ये खात्री होईल अशा बाबी सवतींना समजल्या. यातूनच गुरुवारी दुपारी दोन सवती एका दिलाने तिसरीवर तुटून पडल्या. 'तू आमच्या संसारात येऊ नको' असे म्हणत तिसरीशी वादावादी सुरू होती. ती वादावादी हातघाईवर आल्यानंतर प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पहिल्या व दुसर्‍या पत्नीला 'त्या' काळ्या कोटकडून एक-एक अपत्ये आहेत. 2005 साली पहिले लग्‍न झाल्यानंतर 2014 साली दुसरे लग्‍न संबंधिताने केले. सुरुवातीला या दोन्ही सवती भांडल्या; मात्र दोघींच्या मुलांचे हाल टाळण्यासाठी काही प्रमाणात सवती एक झाल्या. संसाराचा हा गाडा सुरू असताना त्यात आणखी एकीची भर पडणार असल्याने आता दोन्ही सवतींनी एकत्र येऊन नवर्‍याला धारेवर धरले आणि तिसरीलाही त्यांनी टार्गेट केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news