लोणंद : सुरवडीनजीक अपघातात दोघे ठार

लोणंद : सुरवडीनजीक अपघातात दोघे ठार
Published on
Updated on

लोणंद ; पुढारी वृत्तसेवा : लोणंद-फलटण रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी सुरवडीनजीक असणार्‍या जगताप वस्तीजवळ इंडिका व तवेरा या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात शुभम केवटे (रा. संगमनेर, जि. अहमदनगर), सचिन ऊर्फ गोट्या भारत काळेल (रा. वळई, ता. माण) या दोघांचा मृत्यू झाला असून दैवत शामराव काळेल (रा. वळई, ता. माण) हे जखमी झाले आहेत.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यामधून मिळालेली अधिक माहिती अशी की, फलटण-लोणंद रोडवर सुरवडीनजिकच्या जगताप वस्तीजवळ लोणंदकडून फलटणकडे निघालेली इंडिका कार (क्र.एमएच 14 एफसी1104) व फलटण कडून लोणंद कडे निघालेली तवेरा (क्र. एमएच 14 ई-5053) वाहनांचा भीषण अपघात झाला . भरधाव वेगाने येणारी इंडिंका कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने दुसर्‍या लेनमधून समोरून येणार्‍या तवेरा गाडीवर आदळली.

या अपघातात इंडिका कारमधील दोघे जागीच ठार झाले असून अजून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी फलटणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. या अपघातात तवेरामधील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. ही तवेरा देवदर्शन करून लोणंदच्या दिशेने जात होती.

अपघातानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व पोलीस कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. पोलिस पाटील सोमनाथ जगताप यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

अपघातस्थळी पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली. अपघातातील मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. या अपघाताची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news