पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणार्‍यास अटक

पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणार्‍यास अटक
Published on
Updated on

कराड; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेच्या अधिवेशनामध्ये संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्यावरुन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता. याप्रकरणातील मेल पाठवणार्‍या संशयित तरुणास पोलिसांनी राजगड येथून अटक केली. अंकुश सवरटे (वय 23, रा. आलेगाव, पो. कावळगाव, ता. पूर्णा, जिल्हा परभणी, सध्या रा. बालाजीनगर धनकवडी पुणे) असे त्याचे नाव आहे.

दरम्यान, यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून या घटनेचा निषेध करत अशा प्रवृत्तीला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांना धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता. हा मेल अंकुश सरवटे याच्या मेलवरून नांदेड येथून पाठविण्यात आला होता. त्यानंतरच्या चौकशीत संशयित पुणे परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर कराड पोलिसांनी त्यास अटक केली. सोमवारी संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांपुढे हजर करण्यात आले होते. त्यानंतर जामीन मंजूर झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news