परिपत्रकाचे अवमुल्यन करणा-या मुख्याधिकार्‍याला निलंबनासाठी उपोषण

परिपत्रकाचे अवमुल्यन करणा-या मुख्याधिकार्‍याला निलंबनासाठी उपोषण

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  लाड पागे परिपत्रकाचे अवमुल्यन करणार्‍या कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत प्राणांकित उपोषण सुरू केले आहे.

कराड पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पालिकेत बेकायदेशीर केलेल्या सफाई कर्मचार्‍याची नियुक्ती रद्द कराव्यात. कराड नगरपालिकेचे अकाऊंट विभागाचे कर्मचारी कमलेश रवी ढोणे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करावी. आरोग्य विभागामार्फत बाल कामगारांचा वापर केला असल्याने आरोग्य अभियंता, ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान योजनेतून 11 कोटी रुपये दिले होते. त्या कामात भ्रष्टाचार झाल्याने अनेक वेळा तक्रारी देऊनही चौकशी होत नसल्याने तात्कालीन माजी अभियंता एम. एच. पाटील व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, इम्रान मुल्ला, सचिन भिसे, राधाबाई भिसे, धर्मराज गायकवाड, लक्ष्मण कदम, तुषार मोतलिंग, कपिल राऊत आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news