खटावचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण

खटावचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण

खटाव : पुढारी वृत्तसेवा :  खटाव येथील जवान सुरज प्रताप शेळके (वय 23) यांना लेह-लदाख येथे कर्तव्यावर असताना गुरुवारी वीरमरण आले. गेल्या चार दिवसांपासून ते अजारी होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडिल आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
जवान सुरज शेळके यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण खटाव येथे झाले. साडेतीन वर्षांपूर्वी ते लष्करात भरती झाले होते. सध्या ते आरटी रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. अडीच महिन्यापूर्वी ते खटावला सुट्टीवर आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

आजारातून बरे झाल्यावर ते कर्तव्यावर रुजू झाले होते. गुरुवारी सायंकाळी चार वाजता अचानक त्रास झाल्याने त्यांना वीरमरण आले. सध्या लेह-लडाखमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे पार्थिव लष्करी तळावर आणण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news