कराडसह पाटणमधील बंधार्‍यांसाठी ६ कोटी

कराडसह पाटणमधील बंधार्‍यांसाठी ६ कोटी

कराड : पुढारी वृत्तसेवा
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड आणि पाटण तालुक्यातील सिंचनाच्या 16 कामांसाठी सुमारे 6 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंधारे बांधण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील शंभर हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या सिमेंट बंधार्‍यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये कराड तालुक्यातील अंतवडी (खिंड शिवार) येथील बंधार्‍यासाठी 32 लक्ष 85 हजार, अंतवडी (पोळ खडी शिवार) बंधार्‍यासाठी 39 लक्ष 91 हजार, अंतवडी (रत्नकर शिवार) बंधार्‍यासाठी 51 लक्ष 18 हजार, अंतवडी (टेक शिवार) बंधार्‍यासाठी 39 लक्ष 91 हजार, अंतवडी ( गुरबकी शिवार) बंधार्‍यासाठी 36 लक्ष 97 हजार, अंतवडी (नाईकबा मंदिर शेजारी) बंधार्‍यासाठी 29 लक्ष 14 हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

अंतवडी (जाळीचे शेत) बंधार्‍यासाठी 34 लक्ष 3 हजार, डिचोली बाबरमाची ( विठ्ठल कोळेकर विहीर) बंधार्‍यासाठी 30 लक्ष 99 हजार, वहागाव बंधार्‍यासाठी 30 लक्ष 52 हजार, अभईचीवाडी बंधार्‍यासाठी 33 लक्ष 39 हजार, तळबीड बंधार्‍यासाठी 30 लक्ष 52 हजार निधी मंजूर झाला आहे. पाटण तालुक्यातील टेळेवाडी (टेक शिवार) येथील बंधार्‍यासाठी 38 लक्ष 43 हजार, टेळेवाडी (दोधानी शिवार) बंधार्‍यासाठी 37 लक्ष 99 हजार, मालदन (बाधे शिवारच्या मागे) बंधार्‍यासाठी 41 लक्ष 63 हजार, मालदन (बाधे शिवार) बंधार्‍यासाठी 53 लक्ष 36 हजार, खळे बंधार्‍यासाठी 36 लक्ष 87 हजार असे एकूण 5 कोटी 97 लक्ष 75 हजारांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news