दारू विक्री
दारू विक्री

कराड तालुक्यात बनावट दारूची जोमात विक्री

उंडाळे ; वैभव पाटील : कराड तालुक्यात बनावट दारूची विक्री जोमात सुरू असून, काही ठराविक मंडळीही दारू धाब्यावर पोहोच करतात. परंतु, याबाबत दारू बंदी व उत्पादन शुल्क खाते व पोलिस पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहेत.

कराड दक्षिणेच्या डोंगरी भागात अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कराड — चांदोली रोडवरील धाब्यावर सर्रास अवैध दारू विक्री केली जाते. अवैध दारू विक्री बरोबर आता बनावट दारू वाहतूक व विक्रीची विक्रीही या विभागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठराविक मंडळी या व्यवसायात असून या व्यक्ती कराड दक्षिणेतील बहुतेक धाब्यावर ही बनावट दारू कमी किमतीत विक्री करतात. या विभागात बनावट दारूचे पीक फोफावले असून विविध कंपन्यातून उत्पादित होणार्‍या ब्रँडच्या नावाने सर्व बनावट दारू विभागात विक्री केल्या जातात असे चित्र या विभागात आहे.

या विभागातील बहुतांश धाब्यावर कमी दारात व जादा नफा मिळवून देणारी बनावट दारू विक्री केली जात असून या दारूमुळे एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बनावट दारू विक्री व वाहतूक प्रकरणात या विभागातील अनेक जण गुंतले असून उत्पादन शुल्कच्या कृपाशीर्वादाने हे दारू व्यवसाय वाढले आहेत

डोंगरी विभागात सर्रास ठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असून या विक्रीला पायबंध घालण्याऐवजी त्याला पाठबळ दिले जात असल्याचे विभागात बोलले जात आहे. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आता आपला मोर्चा बनावट दारू विक्रीकडे वळवला आहे. बनावट विक्री होणारी दारू नेमकी तयार खोटे होते व ती कुठून कुठे विक्री केली जाते याचा या तपासाचे शिवधनुष्य पोलिस व दारूबंदी उत्पादन विभागाने पेलने गरजेचे आहे. अन्यथा बनावट दारू मुळे एखादा बळी जाईपर्यंत त्याची वाट पाहत हे खाते बसणार की काय याबाबतही परिसरात शंका व्यक्त केल्या जात आहेत.

सध्या विभागात गोवा बनावट, हुबळी मेड व लोकल बनावटीची दारू ब्रँडच्या नावाखाली कमी किमतीच्या खाली मिळत असून, त्यातून अधिक नफा मिळत असल्याने नफ्याचे हव्यासापोटी बनावट दारू विक्री होत आहे. याबाबत नेमकी माहिती संबंधित खात्याला कितपत माहिती उपलब्ध आहे हे समजू शकत नाही तरीही अवैध बनावट दारू मात्र विभागात सर्रास विक्री केली जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

कराड दक्षिणच्या बहुतेक भागात बनावट दारू विक्री केली जात असल्याच्या तक्रारी पिणार्‍या व्यक्तीकडूनच बोलले जात आहेत. दारू पिणार्‍यांना बनावट दारू लगेच ओळखते यावरून त्यांनी संबंधित विक्रेत्यानाही आपण ही दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याची चर्चा आहे. विभागात बियर सह विदेशी दारूतील अस्सल ब्रँड बनावट परिसरात विक्री केले जातात.

काहीजण ताब्यात घेतल्याची चर्चा

कराड दक्षिणेत गेल्या चार दिवसांपूर्वी अवैध बनावट दारू विक्री करताना सातारा की कराड या पैकी एका विभागाच्या पोलिस पथकाने दोघांना बनावट दारू विक्री करणार्‍याला ताब्यात घेतले असल्याची चर्चा आहे. मात्र, संबंधित त्यावर नेमकी कारवाई काय केली हे मात्र समजू शकले नाही. इतकेच काय पण संबंधित विक्रेत्याने कोठे दारू विक्री केली याची माहिती संबंधित आणि पोलिसांना दिल्याची चर्चा आहे. परंतु पोलिसांकडून कोणती कारवाई झाली की नाही याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काहींना ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय माहिती आहे.

logo
Pudhari News
pudhari.news