कण्हेरमधून पाणी सोडले; सतर्कतेचा इशारा

कण्हेरमधून पाणी सोडले; सतर्कतेचा इशारा

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात गत आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सध्या धरण 64.78 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे 0.40 मीटरने उचलून प्रतिसेकंद 2 हजार 192 क्युसेक पाण्याचा विसर्ग सांडव्यावरून वेण्णा नदीच्या पात्रात सुरू केला आहे. यामुळे वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कण्हेरच्या पाणलोट क्षेत्रात यंदा 341 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 6.54 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पश्चिमेकडे जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक मोठी आहे. धरणातील निर्धारित पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून सोमवारी सकाळी विसर्ग करण्यात आला. धरणातील पाण्याचा एकूण साठा हा 185.57 दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. पाणीपातळी ही 684.64 मीटर इतकी झाली आहे.सोमवारी सकाळी धरणावरील सायरन वाजून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास जादा पाणी सोडण्यात येणार धरण पाणलोट क्षेत्रात एका दिवसात सुमारे 30 मिमी पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आठवडाभर पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news