Woman Attacked Over Character Suspicion | चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर चाकू हल्ला

गळ्यावर वार केल्याने महिला गंभीर; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara Crime
Woman Attacked Over Character SuspicionPudhari
Published on
Updated on

कराड : चारित्र्याच्या संशयावरून एकाने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात महिला जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. निता जाधव असे महिलेचे नाव आहे. तर शैलेंद्र नामदेव शेवाळे (रा. कोयना वसाहत, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. संबंधित महिला कराडातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामाला असताना तिची शैलेंद्रशी ओळख झाली. त्यानंतर सन 2007 पासून ही महिला तिच्या मुलांसह शेवाळेसोबत कोयना वसाहत परिसरात राहतात.

Satara Crime
Satara Theft News: सुरवडी येथे चोरी; 2 तोळ्यांचा ऐवज लंपास

काही महिन्यांपासून शैलेंद्र चारित्र्याच्या संशयावरून निताला मारहाण करीत होता. सोमवारी दुपारी कपडे वाळत घालत असताना शैलेंद्र याने तिच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटले आणि तिला कोंडून निघून गेला. जखमी निताने या हल्ल्यची माहिती मुलांना दिली. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Satara Crime
Karad Theft Case : कराडातील रूक्मिणी गार्डनमध्ये घरफोडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news