Umbraj job scam: नोकरीच्या अमिषाने महिलेला 5 लाखांचा गंडा

इंदोली ता. कराड येथील महिलेस आरोग्य विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून 5 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला
Job Scam
Job ScamPudhari
Published on
Updated on

उंब्रज : इंदोली ता. कराड येथील महिलेस आरोग्य विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून 5 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद सौ. स्वाती स्वप्नील निकम यांनी दिली आहे.

महेश पोपट दुबळे (रा. खालकरवाडी, कराड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी स्वाती निकम या गृहीणी आहेत. फिर्यादी डिसेंबर 2022 मध्ये सत्संगला गेल्यानंतर त्यांची महेश पोपट दुबळे यांच्याशी ओळख झाली. यावेळी संशयिताने फिर्यादी व त्यांचे पती स्वप्नील निकम यांना विश्वासात घेऊन नोकरीसाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी स्वाती निकम व त्यांचे पती स्वप्नील निकम यांनी महेश दुबळे यास सुरुवातीला चरेगाव येथील चाफळ फाटा येथे 20 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतर संशयिताने वेळोवेळी फिर्यादीकडे पैशाची मागणी करून आई व मित्रांच्या मोबाईलवर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार एकूण 12 जणांच्या मोबाईलवर फोन पे द्वारे एकूण 2 लाख 92 हजार 288 रुपये महेश दुबळे यांच्या सांगण्यावरून पाठविण्यात आले आहेत.

तसेच याव्यतिरिक्त 56 हजार 899 त्याच्या इतर मित्रांच्या अकाऊंटवर पैसे पाठविले असून एकूण 3 लाख 69 हजार 137 रुपये फोन पे वरून पाठवले आहेत. त्यानंतरही संशयिताने पैशाची मागणी केल्याने फिर्यादी यांनी पुसेगाव येथे दागिने विकून त्यास एक लाख 68 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. असे एकूण 5 लाख 37 हजार 137 रुपये महेश पोपट दुबळे यास 15 मे 2023 ते 5 जानेवारी 2026 दरम्यान दिले आहेत. फिर्यादी यांना सिव्हिल हॉस्पिटल वडूज येथे फार्मसी पदावर नोकरी लावतो असे म्हणून त्याने हे पैसे उकळे आहेत. त्यानंतर नोकरी न लागल्याने व पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news