Udayanraje Shivendraraje Politics | उदयनराजेंचा मनोमिलनाचा चेंडू शिवेंद्रराजेंकडून फडणवीसांकडे

झेडपी-नगरपालिका निवडणुकींचा निर्णय पक्षश्रेष्ठी सांगतील तसा
Udayanraje Shivendraraje Politics
Udayanraje, Shivendraraje(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सातारा : खा. उदयनराजे भोसले व मी भाजपमध्ये आहे. या पक्षाचे आम्ही दोघेही जबाबदार पदाधिकारी आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदी वरिष्ठ नेते घेतील. त्यांचा जो निर्णय असेल त्यानुसार निवडणुका लढवल्या जातील, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘शिवेंद्रराजे सध्या बिझी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा खा. उदयनराजेंनी टाकलेला चेंडू शिवेंद्रराजेंनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पाठवला आहे.

यावेळी ना. शिवेंद्रराजे म्हणाले, राजवाडा येथे असलेल्या जुन्या दवाखान्याच्या जागेत अद्ययावत बहुमजली पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामास मान्यता व मंजुरी मिळाली असून, निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या जागेच्या विकासासाठी जिल्हा परिषदेची एनओसी घेण्यात येणार आहे. त्याबाबत सीईओंशी चर्चा झाली आहे. ही जागा नगरपालिकेने पार्किंगसाठी आरक्षित केली आहे. शहरात पार्किंगची फार समस्या असतानाच या गजबजेल्या परिसरात पार्किंगची आवश्यकता होती. हॉकर्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Udayanraje Shivendraraje Politics
Satara News | कामगार रुग्णालयाची जागा हस्तांतरित

हा प्रकल्प अत्याधुनिक असेल. तळमजला, पहिला, दुसरा व तिसरा मजला आणि टेरेस अशी या इमारतीची रचना असेल. राजवाड्याचा हेरिटेज लूक विचारात घेऊन त्याचे इलेवेशन ठेवण्यात आले आहे. 150 चारचाकी वाहनांचे पार्किंग होईल. 75 टॉल्स, टेरिसवर रेस्टॉरंट, कॅफिएट एरियामध्ये 25 कॅफेज होतील. 100 दुचाकींचेही पार्किंग होणार आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी महायुतील सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन खा. उदयनराजे व इतर लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन करण्यात येणार आहे. या जागेतील झाडे वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्या जनावरांच्या दवाखान्याची जागा नगरपालिका हस्तांतरित झाली आहे काय? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, याबाबत पर्वूी नगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा झाला होता. बहुमजली पार्किंगच्या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम कोणाकडूनही घडो ते होणे महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प 50 कोटींचा आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प होत आहे. निविदा प्रक्रिया झाली आहे. निधीची आवश्यकता भासल्यास त्याची शासनाकडून पूर्तता करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Udayanraje Shivendraraje Politics
Shivendraraje Bhosale | पक्षाची एकजूट कायम ठेवा : ना. शिवेंद्रराजे

खा. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे बिझी असल्याचे वक्तव्य केले होते याकडे लक्ष वेधले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदि वरिष्ठ नेते घेतील. त्यांचा जो निर्णय असेल त्यानुसार निवडणुका लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूर येथे झालेल्या मारामारीबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, प्रत्येकाला निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. काही वेळा कार्यकर्त्यांच्या भावना अनावर होतात आणि त्यातून असे प्रकार घडतात. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना नियंत्रणात ठेवाव्यात. घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय आहे. या घटनांचे विचित्र पडसाद उमटू नयेत म्हणून लातूर जिल्हा प्रशासन व पोलिसांना निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी विकसित करण्यात येणार्‍या जागेच्या आराखड्याची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगर अभियंता दिलीप चिद्रे, माजी नगरसेवक भालचंद्र निकम उपस्थित होते.

सातार्‍यात रस्त्यावर फ्लेक्स लावायचे बंद झाले पाहिजे : ना. शिवेंद्रराजे

सातार्‍यातील रस्त्यांवर फ्लेक्स लावायची पद्धत बंद झाली पाहिजे. माझ्यासह उदयनराजे यांच्यासाठीचे बोर्ड असले, तरी ते बंद झाले पाहिजेत यासाठी पोलिसांना सूचना करणार आहे. रस्त्यावरचे फ्लेक्स धोका निर्माण करतात. वाहतुकीचा खोळंबा होतो. दुकाने त्यामुळे झाकली जातात. अशा फ्लेक्सला परवानगी देऊ नयेत, अशा सूचना मुख्याधिकारी तसेच पोलिसांना करणार असल्याचे ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news