Satara News | कामगार रुग्णालयाची जागा हस्तांतरित

हॉस्पिटल उभारणीचा मार्ग अखेर मोकळा : पाच एकर भूखंडाची मोजणी
Satara News |
भूखंड हस्तांतर पत्र रमेश चांदणे यांच्याकडे सुपूर्द करताना डॉ.अमितकुमार सोंडगे. शेजारी मासचे अध्यक्ष संजोग माहिते, धैर्यशील भोसले, राजेंद्र मोहिते व पदाधिकारी.Pudhari Photo
Published on
Updated on

खेड : सातारा औद्योगिक वसाहती-मधील पशुसंवर्धन विभागाची पाच एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या परवानगीने कर्मचारी राज्य विमा निगम विभागाकडे कामगार हॉस्पिटलसाठी हस्तांतरित करण्यात आली. या प्रक्रियेच्या संदर्भाने भूखंड हस्तांतरण पत्र कर्मचारी राज्य विमा निगमचे रमेश चांदणे यांनी स्वीकारले. यामुळे हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा औद्योगिक वसाहती-मधील 1 लाख कामगार आणि 2 लाख 70 हजार कुटुंबीय वैद्यकीय सुविधांसाठी कर्मचारी राज्य विमा निगमवर अवलंबून आहेत. जिल्ह्यामध्ये कर्मचारी राज्य विमा निगम विभागाचे हॉस्पिटल नसल्याने या संदर्भात मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. खा. उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्या-मुळे सातारा जिल्ह्यात 100 बेडचे कर्मचारी राज्य विमा निगम हॉस्पिटल मंजूर झाले. या जागेचे हस्तांतरण पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाकडून नुकतेच वितरित करण्यात आले.

सातार्‍याच्या औद्योगिक क्षेत्रात जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाची पाच एकर जागा शिल्लक होती. भूखंड क्रमांक सी थ्री मध्ये या हॉस्पिटलला जागा देण्यात आली आहे. याबाबतचा पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समन्वयाने या जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला. दुग्ध व्यवसाय विकास विभागाने ईएसआयसी हॉस्पिटल करता पाच एकर जागा राज्य विमा निगम विभागाकडे हस्तांतरित करण्यास परवानगी दिली होती. त्याची शिफारस स्वतः ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news