ठाकरेंचा पवारांना ‘दे धक्का’

पाटणमधून हर्षद कदम यांना उमेदवारी; पाटणकरांचा पत्ता कट
Maharashtra Assembly election 2024
ठाकरेंचा पवारांना ‘दे धक्का’Pudhari Photo
Published on
Updated on

कराड ः पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी मंत्री तथा खासदार शरद पवार समर्थक विक्रमसिंह पाटणकर गटाला मोठा धक्का बसला आहे. हर्षद कदम यांनी सातत्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली असतानाच त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ठाकरे गटामध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे. त्याचवेळी पाटणकर समर्थकांमध्ये मात्र खळबळ उडाल्याचे दिसून आले. मविआमध्ये हा उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना ‘दे धक्का’ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मविआत ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Assembly election 2024
‘आप’ महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक लढवणार नाही

पाटण विधानसभा मतदारसंघात मागील तीन ते चार दशकांपासून शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर गट पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली होती.त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांचेच नाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर होईल, अशी पाटणकर समर्थकांची अटकळ होती. मात्र बुधवारी सायंकाळी हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर ठाकरे गटामध्ये उत्साह पहावयास मिळत असून पाटणकर समर्थकांमध्ये अक्षरशः सन्नाटा पसरला आहे.

दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लावला होता. यात पालकमंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनीही मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मल्हारपेठ (ता. पाटण) येथील हर्षद कदम यांना जिल्हाध्यक्ष पद देत जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर हर्षद कदम यांनी सातत्याने मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात अक्षरशः रान उठवले आहे. मागील महिन्यात मंंत्री देसाई यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत हर्षद कदम यांनी जनआक्रोश मोर्चाही काढला होता. तेव्हापासून मंत्री शंभूराज देसाई समर्थक व हर्षद कदम समर्थकांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हर्षद कदम व महायुतीचे उमेदवार म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांच्यात लढत होणार असल्याने पाटणकर गटाची भूमिका काय असणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे देसाई व पाटणकर गट कायम आमने सामने लढले आहेत. दोघांमध्ये मतांचा फरकही कधी शेकड्यातही राहिला आहे. त्यामुळे पाटणकरांचा पत्ता मविआतून कट झाल्याने पाटणसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पाटणकर गटाला तर फार मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Assembly election 2024
LIVE : उत्तर महाराष्ट्र- नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाचे अपडेट्स पहा एका क्लिकवर

थांबा आणि पाहा... बर्‍याच घडामोडी घडणार : पाटणकर गट

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षद कदम यांनी आपण सर्वांना सोबत घेऊन मंत्री देसाई यांच्या विरोधात लढा देणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी उमेदवारीबाबत पाटणकर गट अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या गटाकडून थांबा आणि पाहा अजूनही बर्‍याच घडामोडी घडणार आहेत, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news