Satara-Lonand road accident : सातारा-लोणंद मार्गावर सालपे नजीक मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात; ३ जण ठार तर ८ जण जखमी

हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला
Satara-Lonand road accident
Satara-Lonand road accident : सातारा-लोणंद मार्गावर सालपे नजीक मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात; ३ जण ठार तर ८ जण जखमीFile Photo
Published on
Updated on

Terrible mini travel-truck accident near Salpe on Satara-Lonand road; 3 killed, 8 injured

सातारा : पुढारी वृत्तसेवा

लोणंद - सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधुन उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Satara-Lonand road accident
Satara News | परळीत अत्याधुनिक स्टेडियम उभारणार : ना. शिवेंद्रराजे भोसले

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच ०४ सीपी २४५२ ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताराकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 42 बीएफ 7784 हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला.

Satara-Lonand road accident
Satara News | मातृभूमीसाठी वाईतील जवानांचीही शर्थ

या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या विषयात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते. पुढील तपास सपोनि सुशील भोसले करीत आहेत.

यामध्ये मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24) रा.मालगाव पाटील गल्ली गणेश नगर शिरढोण तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. रजनी संजय दुर्गुळे (वय 48) रा.पेठ वडगाव तालुका हातकलंगले अशी नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news