खंडकर्‍यांना मिळणार एक एकराच्या आतील जमिनी

शेतकर्‍यांच्या मदतीला धावले आ. रामराजे : राज्यात प्रथम फलटणमध्ये वाटप
Satara News
आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार करताना लक्ष्मणराव नाईक निंबाळकर व इतर.Pudhari Photo
Published on
Updated on

साखरवाडी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील खंडकरी शेतकर्‍यांसाठी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा धावून आले आहेत. ज्या खंडकरी शेतकर्‍यांची जमीन एक एकर किंवा त्या पेक्षा कमी होती अशा खंडकरी शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यात प्रथम फलटण तालुक्यामध्ये वाटप करण्यात येत असल्याची माहिती खंडकरी शेतकरी संघटनांचे अध्यक्ष लक्ष्मणराव निंबाळकर यांनी दिली.

Satara News
सातारा विभागात 300 बसेस खटारा

याबाबत अधिक माहिती देताना निंबाळकर म्हणाले, राज्यामध्ये असणार्‍या खंडकरी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचे काम आ. रामराजे यांनी केले आहे. राज्यातील खंडकरी शेतकर्‍यांचे नेतृत्व रामराजे यांनी केल्यामुळे राज्यातील सर्व खंडकरी शेतकर्‍यांना गत काही वर्षांपूर्वी जमिनी पुन्हा मिळाल्या होत्या. खंडकरी शेतकर्‍यांना पुन्हा जमिनी मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आ. रामराजे हे होते. यामुळे राज्यातील खंडकरी शेतकर्‍यांना पुन्हा जमिनी मिळाल्या आहेत. यासोबतच एक एकराच्या आतमधील शेतकर्‍यांना जमिनी वाटपाचे काम राहिले होते. ते वाटप आता करण्यात आले आहे.

Satara News
सातारा : वाईतील गणपती घाट पाण्याखाली

फलटण तालुक्यामध्ये एक एकराच्या आतील एकूण 129 खंडकरी शेतकरी होते. त्यामधील 95 शेतकर्‍यांना पुन्हा जमीन देण्याचे आदेश दि. 06 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित खंडकरी शेतकर्‍यांची यादी सुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. फलटण तालुक्यामधील सरडे, सोनगाव, सांगवी, जिंती, फडतरवाडी, सुरवडी, निंभोरे, काळज, तडवळे, रावडी खु.॥, रावडी बु.॥, मुरुम, खामगाव या गावामध्ये एक एकराच्या आतील शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. होळ व पिंपळवाडी गावामधील खंडकरी शेतकर्‍यांचे वाटप नजीकच्या काळात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे याकामी सहकार्य लाभले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news