सातारा : वाईतील गणपती घाट पाण्याखाली

धोममधून 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग?
Ganapati Ghat in Wai
वाईतील गणपती घाट
Published on
Updated on

वाई : महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला. लगतच्या अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे.

Ganapati Ghat in Wai
Pune Flood Update : 'पारगाव' पुलाचा भराव खचला; शिरूर-सातारा मार्गावरील वाहतूक बंद

बलकवडी धरण 85 टक्के भरल्याने बलकवडीतून धोममध्ये 3 हजार 400 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धोम धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, धोम धरणही 84 टक्के भरले आहे. मंगळवारी धरणाचे दोन दरवाजे 1.5 फुटांपर्यंत उघडून पाणी सोडण्यात आले. यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Ganapati Ghat in Wai
कागल-सातारा सहापदरीकरणाचा खेळखंडोबा!

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून पाऊस न थांबल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नागेवाडी धरणक्षेत्रातसुद्धा समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हेेही धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, धोम धरण भरल्याने वाईचा पाणीप्रश्न आता संपुष्टात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news