Tigress Enters Chandoli Forest | ताडोबातील दुसरी वाघीण चांदोली जंगलात दाखल

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणार वाघांचे जनुकीय संवर्धन
Tigress enters Chandoli forest
Tigress Enters Chandoli Forest | ताडोबातील दुसरी वाघीण चांदोली जंगलात दाखलPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : महाराष्ट्र वन विभागातर्फे मंगळवारी (दि. 9) सायंकाळी दोन वर्षांची वाघीण टी 7-एस 2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. ‘ऑपरेशन तारा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ही वाघीण स्थलांतरित करण्यात आली आहे. या प्रकल्पातून चांदोली अभयारण्यात सोडलेली ही दुसरी वाघीण आहे. या दोन्ही वाघिणींमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे जनुकीय संवर्धन होण्यास मोठी चालना मिळणार आहे.

टी 7-एस 2 असा टॅग असलेली ही वाघीण 8 डिसेंबर रोजी सायंकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोराळा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे पकडली होती. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) व रॅपिड रेस्क्यू टीम, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केलेल्या तपासणीत ही वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले होते. सॉफ्ट रीलिज पद्धतीमुळे

वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला या वाघिणीच्या स्थलांतराबाबत बोलताना म्हणाले की, वाघीण टी 7-एस 2 ही कोराळा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातील तरुण, सशक्त व नैसर्गिकरीत्या भ्रमणशील मादी आहे. तिचे आरोग्य उत्कृष्ट असून, स्थलांतरासाठी ती सर्वार्थाने योग्य आहे. ‘ऑपरेशन तारा’अंतर्गत स्थलांतरित होणारी ही दुसरी मादी असून, तिची उपस्थिती सह्याद्री परिसरातील व्याघ्र संवर्धनास अधिक बळकटी देईल.

‘ऑपरेशन तारा’अंतर्गत ताडोबा व सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे राज्यातील व्याघ्र संवर्धन चळवळ अधिक भक्कम होत आहे. दुसर्‍या वाघिणीचे यशस्वी पुनर्स्थापन हे आमच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांच्या कौशल्याचे व समर्पणाचे प्रतीक आहे.
एम. श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

ही संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश, फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करत असून, या मोहिमेवर सहायक निरीक्षक (प्रोजेक्ट टायगर) डॉ. नंदकिशोर काले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे.

ताडोबामधून आलेली वाघीण टी 7-एस 2 चा सॉफ्ट रीलिज हा सह्याद्रीतील वाघ पुनर्स्थापन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वाघीण पूर्णतः निरोगी असून, चांदोली परिसरात तिला आवश्यक असा सुरक्षित अधिवास व पुरेशा प्रमाणात भक्ष्यसाठा उपलब्ध आहे. आमची क्षेत्रीय पथके व शास्त्रीय तज्ज्ञ संस्था तिच्या सातत्यपूर्ण देखरेखीसाठी पूर्णतः सज्ज आहेत.
तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

वाघिणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रीलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोराळा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली. ही संपूर्ण क्षेत्रीय कार्यवाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त पथकांद्वारे राबवण्यात येत असून, या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), मुंबई डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.

Tigress enters Chandoli forest
Satara News: महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजनांना धत्तुरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news