Mahesh Shinde | विकासकामांसाठी निता खरात यांच्या पाठीशी रहा : आ. महेश शिंदे

कोडोली जिल्हा परिषद गटातही सौ. निता खरात यांच्या माध्यमातून स्थानिकच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना साथ देवून विकासाला गती द्या, असे आवाहन आ. महेश शिंदे यांनी केले
Mahesh Shinde
Mahesh Shinde Pudhari
Published on
Updated on

कोडोली : कोडोली जिल्हा परिषद गटात येणारी गावे माझ्या मतदार संघात येतात. राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आहे. खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले व मी एकत्र बसून या विभागात आमच्या विचाराचे सक्षम, सुसंस्कृत, स्थानिक उमेदवार दिले आहेत. कोडोली जिल्हा परिषद गटातही सौ. निता खरात यांच्या माध्यमातून स्थानिकच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना साथ देवून विकासाला गती द्या, असे आवाहन आ. महेश शिंदे यांनी केले आहे.

कोडोली गटातील कोडोली, समर्थनगर, संभाजीनगर, खिंडवाडी, कारंडवाडी, देगाव, जैतापूर, चिंचणेर वंदन या गावातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी कोडोली गटातील भाजपच्या उमेदवार सौ.निता खरात, कोडोली गणाचे उमेदवार रामदास साळुंखे, संभाजीनगर गणाचे उमेदवार विजया साळुंखे उपस्थित होते.

आ. महेश शिंदे म्हणाले, या गटातील भाजपा उमेदवार सौ. निता खरात, पती बाळासाहेब खरात यांचे संपूर्ण कुटुंब कोडोली गावचे स्थानिक रहिवासी आहेत. बाळासाहेब खरात यांनी कोणतेही पद न घेता माझे व खा. उदयनराजे, ना. शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून गटातील गावागावात विकासाचा डोंगर उभा केला आहे. खरात कुटुंब खा.उदयनराजे यांचे खंदे समर्थक असल्याने राजकारणापेक्षा त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जनतेच्या घराघरात, मनामनात स्नेहाचे ॠणानुबंध निर्माण केले आहेत.

दरम्यान, एमआयडीसी येथील महिला मेळाव्यात श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, बाळासाहेब खरात कुटुंबाचे अनेक वर्षांपासून छत्रपतींच्या घराण्याशी अत्यंत जवळचे व स्नेहाचे संबंध आहेत. खा. उदयनराजे यांच्या माध्यमातून कोडोली गटातील विकास कामांना भरभरून निधी उपलब्ध करून दिल्याने गावागावात विकासाचा कायापालट झाला आहे. सौ.निता बाळासाहेब खरात या सुशिक्षित, सुसंस्कृत व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तडफदार महिला उमेदवार असून मतदारांच्या विश्वासाला त्या तडा जाऊ देणार नाहीत. सौ.निता खरात म्हणाल्या, कोडोली गटामध्ये खा.उदयनराजे, ना.शिवेंद्रराजे व आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली आहे. या सर्वांच्या माध्यमातून कोडोली गटात विकास कामांना भरभरून निधी उपलब्ध झाला आहे. विकासकामाना गती देण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन सौ.निता खरात यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news