शिवेंद्रराजे भोसले, जयुकमार गोरे, डॉ. अतुल भोसले पुन्हा मैदानात

Maharashtra Assembly Polls | भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी
Maharashtra Assembly Polls |
शिवेंद्रराजे भोसले, जयुकमार गोरे, डॉ. अतुल भोसले यांना भाजपकडून विधानसभा निवडणूकीची उमेदवारी जाहीर झाली.Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. रविवारी दुपारी भाजपने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये सातारा-जावली मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले, माण-खटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे, कराड दक्षिण मतदारसंघातून अतुल भोसले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपने यादी जाहीर केल्यानंतर यांच्याविरोधात मविआतून कोण? याकडे आता लक्ष लागले आहे.

दि. 15 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब येथे आले असता दोन दिवसांत जागा वाटप होईल, असे सूतोवाच केले होते. त्यानंतर रविवारी मुंबई येथे भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राज्यातील विविध जागांवर 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात सातारा जिल्ह्यातील सातारा-जावली, माण-खटाव आणि कराड दक्षिण मतदारसंघाचाही समावेश आहे.

Maharashtra Assembly Polls |
Maharashtra Assembly Poll| राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचा स्‍ट्राईक रेटवर भर

भाजपने जिल्ह्यातील ज्या जागा जाहीर केल्या आहेत तेथे भाजपचे वर्चस्व आहे. सातारा आणि माण मतदारसंघांत भाजपचे विद्यमान आमदारच उमेदवार आहेत तर कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांचे संघटन लक्षात घेऊन त्यांना पुन्हा संधी दिली आहे. सातारा-जावली मतदारसंघात विद्यमान आ. शिवेंद्रराजेंचा होल्ड कायम आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मेळाव्यात खा. उदयनराजे भोसले यांनी शिवेेंद्रराजेंना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा शब्द दिला आहे. या निवडणुकीत खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांचे मनोमीलन झाल्याने ते शिवेंद्रराजेंच्या पथ्यावर पडले आहे.

माण- खटाव मतदारसंघात तीन टर्म जयकुमार गोरे हे आमदार आहेत. आमचं ठरलयं टीम आणि महाविकास आघाडीच्या ताकतीला त्यांनी कायम सीमेवर ठेवले आहे. तसेच राष्ट्रवादीलाही बॅकफूटवर आणले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह ना. निंबाळकर यांना आ. गोरे यांनी 25 हजारांचे लीड दिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताब्यात आहे. भाजपाचे लोकसभा प्रभारी म्हणून डॉ. अतुल भोसले यांनी चांगले काम केले आहे. कराड दक्षिणमधून खा. उदयनराजे यांना मताधिक्य देत त्यांच्या विजयात महत्वाचा हातभार लावला आहे. यावरूनच त्यांना पुन्हा एकदा भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, भाजपने या तीन मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसमधून पृथ्वीराज चव्हाण यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर सातारा आणि माण मतदारसंघ मविआमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहणार आहे. या ठिकाणी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news