

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) यांनी महाविकास आघाडीमधून जास्त जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्ट्राईक रेटवर पुन्हा जोर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन ८५ वर चर्चा सुरु आहे. सध्या महाविकासआघाडीमध्ये जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. पण स्ट्राईक रेटवरच भर देणार असल्याचे धोरण पवार गटाचे आहे.
बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८५ जागा लढणार असल्याचे सूत्रांकडून कळते. दरम्यान बैठकीमध्ये शरद पवार यांनी जागा वाटपासाठी जास्त ताटकळत न थांबता उमेदवारांना तयारी वेळ देण्यात यावा अशा सूचना वरीष्ठ नेत्यांना केल्या आहेत. या बैठकीत पश्चीम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जागा
मिळवण्यासाठी आपल्याकडे कशा घेता येतील यावर चर्चा झाली. तर पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीनंतर पक्षाच्या सर्व खासदारांसोबत पवार यांची बैठक सुरु असून विधानसभा निवडणूकीसाठी जबाबादाऱ्यांचे वाटप करण्यात येत आहे.