राजधानी सातार्‍यात अवतरला शिवकाल

सर्किट हाऊस ते संग्रहालय राजेशाही मिरवणूक; वाघनखांचे ऐतिहासिक अनावरण
Capital Satara
ऐतिहासिक वाघनखांच्या अनावरण सोहळ्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय परिसर शिवकालात हरवून गेला. शिवपराक्रमाच्या गगनभेदी गर्जना, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके लक्षवेधक ठरली. Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृतसेवा

प्रतापगडावर घडलेल्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या वाघनखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण करण्यात आले. सातार्‍यातील पोवई नाका येथे असलेल्या शिवमूर्तीला अभिवादन करुन काढण्यात आलेली भव्य-दिव्य रॅलीत शिवपराक्रमाच्या गगनभेदी गर्जना, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी शाहूनगरीत शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची चौथी राजधानी सातार्‍यात दाखल झाली आहेत. सातारकरांना ही वाघनखे पाहण्यासाठी भव्यदिव्य कार्यक्रमाने खुली करण्यात आली. शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन, संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे उपस्थित होते.

Capital Satara
सातारा : जिल्ह्यात पावसाळी पर्यटन बहरू लागले

उद्घाटन सोहळ्यापूर्वी पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पोवई नाका ते संग्रहालय अशी फुलांनी सजवलेल्या जिप्सीतून त्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत सातारकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली संग्रहालयात आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर संग्रहालयाच्या कोनशिलेचे अनावरण करत उद्घाटन मान्यवरांनी केले. संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी संग्रहालयातील सातारच्या गादीचे तख्त, शस्ंत्रास्त्रे याची पाहणी करून तिसर्‍या कक्षात असणार्‍या ऐतिहासिक वाघनखांचे लोकार्पण केले.

Capital Satara
शिवरायांच्या वाघनखांवरून राजकीय रणकंदन

यावेळी संग्रहालयाच्या संपूर्ण इमारतीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. इमारतीवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. दर्शनी भागातही ऐतिहासिक बाज असलेला मनोरा उभारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संग्रहालय व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.

मर्दानी खेळांनी जागवला शिवकाल

संग्रहालयाच्या दर्शनी भागात कोल्हापूर येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या मावळ्यांकडून ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वीटा, बाण, पट्टा लढत, काठी, कुर्‍हाड व तलवारीच्या लढतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. फेटेधारी मावळे, घोडे, तुतारीचा निनाद अन् शिवप्रराक्रमाच्या गर्जनांनी वातावरण शिवमय झाले.

Capital Satara
शिवप्रताप दिन विशेष : शिवाजी महाराज यांची वाघनखे आहेत कुठे?

सोहळा पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन

सातार्‍यात आलेल्या ऐतिहासिक वाघनखांचा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी संग्रहालयात पार पडला. या सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना संग्रहालयात प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे सातारकरांना हा ऐतिहासिक क्षण पाहता यावा. याची जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली होती. राजवाडा येथील गांधी मैदानावर व पोवई नाका येथे मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. त्यामुळे ज्या सातारकरांना या सोहळ्यास जाता आले नाही, त्यांनी एईडी स्क्रीनवर सोहळा पाहून हा ऐतिहासक क्षण डोळ्यात सामवून घेतला.

Capital Satara
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच

परिसर झाला सेल्फी पॉईंट

कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आकर्षण ठरली होती. तसेच गड, किल्ल्यांच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या. ठिकठिकाणी तोफा, महाकाय डमरू, तबला ठेवण्यात आला होता. या प्रतिकृतींसमवेत अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news