सातारा : जिल्ह्यात पावसाळी पर्यटन बहरू लागले

सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे रुपडे पालटले : चिंब भिजण्यासाठी तरुणाई आतुर
Satara tourism
पावसाचा बालेकिल्ला असलेल्या महाबळेश्वरमधील अल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. pudhari News

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला असून, वर्षा पर्यटनाला बहर येऊ लागला आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास, ठोसेघर, कोयना परिसरातील निसर्गाचे रुपडे पालटले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेकांची पावले वळू लागली आहेत.

उशिरा का होईना पश्चिमेकडे जलधारा कोसळू लागल्या आहेत. या मार्गावरील डोंगर कपारीत कोसळणारे छोटे-मोठे धबधबे आता आकर्षित करू लागले आहेत. धुक्याची दुलई पांघरलेला हा परिसर तरूणांसाठी आल्हाददायक ठरू लागला असून दाट धुक्यात आणि रिमझिम पावसात भिजण्याची अनोखी मजा लुटण्यासाठी युवा वर्ग संधीची वाट पाहू लागला आहे.

Satara tourism
Nashik | सुरक्षेसाठी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश

निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोेका घेऊन अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करुन पावसाच्या वर्षावाने चिंब चिंब भिजणारा निसर्ग असे विहंगम द़ृश्य महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पाहावयास मिळत असून ऐन पावसातही अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर-पाचगणी परिसरात संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे येथील पावसाचे न्यारे रूप पहावयास मिळत आहे. धुक्याची शाल पांघरलेली, सतत होणारी पर्जन्यवृष्टी, या सर्वांचा मनमुराद आनंद लुटणारी सळसळती तरुणाई चिंब - चिंब होऊन बागडताना पाचगणी परिसरात पहावयास मिळत आहे.

Satara tourism
गोपी थोटाकुरांमुळे भारतीयांसाठीही अंतराळ पर्यटन खुले

सातारा शहर व परिसरात रविवारी पहाटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहर व परिसरात दिवसभर पावसाच्या अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. रविवार बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी उघड्यावर बसलेल्या विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. दुपारी 3 नंतर शहर व परिसरात पावसाचा जोर वाढला होता. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम

भागात पावसाची संततधार कायम आहे.

सातारा जिल्ह्यात रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 24.3 मि. मी., जावली 37.7 मि. मी., पाटण 41.7 मि. मी., कराड 17.9 मि. मी., कोरेगाव 9.2 मि. मी., खटाव 4.2 मि. मी., माण 3.7 मि. मी., फलटण 8.3 मि. मी., खंडाळा 14.1 मि. मी., वाई 18.0 मि. मी., महाबळेश्वर 90.7 मि. मी. पावसाची नोंद झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news