Sharad Pawar: ‘रयत‌’च्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

उपाध्यक्षपदी पाचजणांची वर्णी : सचिवपदी विकास देशमुख
Sharad Pawar
Sharad Pawarfile photo
Published on
Updated on

सातारा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा खा. शरद पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले, अरूण कडू-पाटील, पी. जे. पाटील, मुनताजअली शेख व महेंंद्र लाड यांची निवड करण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी खा. शरद पवार, उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले, अरुण कडू-पाटील, पी. जे. पाटील, मुनताजअली शेख व महेंंद्र लाड यांची तर सचिवपदी विकास देशमुख तर मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी ॲड. भगीरथ शिंदे, आ. दिलीप वळसे-पाटील, रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार, मीनाताई जगधने, आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. सुप्रिया सुळे, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित पाटील, जनार्दन जाधव, बाबासाहेब भोस, संदीप वर्पे, शहाजी डोंगरे, सुरेश बोळीज, दत्तात्रय जाधव, डॉ. विठ्ठल शिवणकर, डॉ. नानासाहेब गायकवाड, राजेंद्र चांदे, डॉ. दत्तात्रय हिंगणे, रवींद्र भोईर, डॉ. धनंजय नलवडे, प्रदीप हिवरकर, जयराम पाटील यांची निवड करण्यात आली. यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

दरम्यान, निवडीपूर्वी सर्वपदासाठी अनेकांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. अध्यक्षपदासाठी एकमेव खा. शरद पवार यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपाध्यक्षपदासाठी 5 जागांसाठी 6 अर्ज आले होते. त्यापैकी एकाने अर्ज माघार घेतल्याने सर्वच्या सर्व 5 जागा बिनविरोध झाल्या. अर्ज मागे घेण्यासाठी खा. शरद पवार यांच्यासमोर मोठी खलबते झाली. शेवटी संस्थेच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा खा. शरद पवार यांनी केली.

खा. पवार रयतचे 13 वेळा अध्यक्ष

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा खा. शरद पवार हे सन 1990 पासून संभाळत आहेत. दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड केली जाते. त्यानुसार सन 1990, 1993, 1996, 1999, 2002, 2005, 2008, 2011, 2014, 2017, 2020, 2023, 2026 अशी सलग 13 वेळा रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खा. शरद पवार यांची निवड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news