Sharad Pawar: आजारपणातून सावरल्यानंतर शरद पवार पुन्हा मैदानात

साताऱ्यात कार्यक्रम : कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहणार
Sharad Pawar
Sharad Pawarfile photo
Published on
Updated on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार हे काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होताच ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी पुन्हा राजकीय व सामाजिक कार्यक्रमांना धडाक्यात सुरुवात केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तान शुक्रवारी (दि. 8) आणि शनिवारी (दि.9) ते साताऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

खा. पवार यांची तब्येत मध्यंतरी बिघडली होती. आजारपणामुळे पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ते पुन्हा राजकीय व सामाजिक आखाड्यात उतरले आहेत. शुक्रवारी त्यांचे साताऱ्यात आगमन होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये तसेच रयत सेवकांमध्ये उत्साह संचारला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी खा. पवार यांचा दौरा आयोजित केला आहे. रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर शनिवारी रयत शिक्षण संस्थेमध्ये आयोजित केलेल्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पवार यांच्या दौऱ्यावळी जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त आहे. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर ते काय बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news